Infosys चे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची एकूण उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना “आठवड्यातून ७० तास” कामाचा फॉर्म्युला दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडिया तज्ज्ञ आणि इतर अनेकांनी मूर्तींच्या फॉर्म्युलावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा नित्यक्रमांमुळे हृदयाशी संबंधित समस्या आणि तणावाशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते, यावर काहींनी जोर दिला आहे. नारायण मूर्तींच्या विधानानंतर सोशल मीडियावर वाद उफाळून आला असतानाच News18 ने नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा यांच्याशी खास बातचीत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच पार पडलेल्या १४ व्या टाटा लिट फेस्टमध्ये एका लेखिकेच्या भूमिकेत मुंबईला भेट देत सुधा यांनी रविवारी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे चर्चासत्र आयोजित केले. News18 बरोबर बातचीत करताना सुधा मूर्ती यांनी अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केली. नारायण मूर्ती यांच्याबरोबरच्या आयुष्याविषयी बोलताना सुधा म्हणाल्या की, त्यांच्या नवऱ्याचा उत्कटता अन् खऱ्या मेहनतीवर विश्वास आहे. सध्याच्या आठवड्यातून ७० तास कामाच्या वादविवादावर त्या म्हणाल्या, “त्यांनी आठवड्यातून ८० ते ९० तास काम केले आहे, त्यामुळे यापेक्षा किती कमी तास काम करतात हे त्यांना माहीत नाही. त्यांचा खऱ्या मेहनतीवर विश्वास आहे आणि ते तसेच जगले आहेत. त्यामुळे त्यांना जे वाटले ते त्यांनी सांगितले आहे.” “लोकांच्या व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पण ते तसेच जगले आणि ते बोलून गेले. त्यामुळे त्यांनी त्ंयाचा अनुभव शेअर केला,” असंही सुधा मूर्ती यांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘गुजरातमधील डायमंड बोर्समुळे महाराष्ट्रावर विपरीत परिणाम होणार नाही’; एमआयडीसीचा खुलासा

नारायण आणि सुधा मूर्ती यांच्या लग्नाला सुमारे ४५ वर्षे झाली आहेत आणि त्यांनी एकमेकांना कसा पाठिंबा दिला याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. त्यांना नारायण मूर्तींकडून गेल्या काही वर्षांत काय शिकायला मिळाले, असे विचारल्यावर सुधा यांनी पटकन उत्तर दिले, “मी (त्यांच्याकडून) खूप काही शिकले.

हेही वाचाः Money Mantra : SCSS किंवा बँक एफडीमध्ये वयोवृद्धांसाठी कोणती योजना चांगली? अधिक फायदे कुठे?

मुख्य गोष्ट म्हणजे, ‘ध्येय ठेवा आणि त्यासाठी काम करा, विचलित होऊ नका’. ते (नारायण मूर्ती) एक ध्येय ठेवतात आणि त्यावर काम करतात. दुसरं असं की, ‘तुम्ही काम करत असताना कोणतीही कसर सोडू नका’. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ‘तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही नक्कीच प्रगती कराल. तुम्हाला बुद्धिमत्ता आणि स्मार्ट मेहनत पुढे घेऊन जाईल,” असंही त्यांनी अधोरेखित केलं.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan murthy works 80 to 90 hours in a week said his wife sudha murthy vrd