Consumer Brand : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कंपन्यांना ग्राहकांच्या आवडीनुसार काम करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला यशस्वी ब्रँड बनवायचा असेल, तर तुम्हाला ग्राहकांना त्यांच्या पैशाच्या मोबदल्यात अधिक चांगल्या सेवा द्याव्या लागतील. नारायण मूर्ती यांनी म्हैसूर येथील व्हीनस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वार्षिक परिषदेत यशस्वी ग्राहक ब्रँड तयार करण्याबाबतचे त्यांचे अनुभव व्यावसायिकांबरोबर शेअर केले. सर्व ब्रँड्सनी ग्राहकांना जास्तीत जास्त मूल्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. ब्रँड्सनी त्यांच्या जाहिरातींमध्ये जे देण्याचा दावा केला आहे, त्यापेक्षा सुमारे १० टक्के अधिक द्यायला हवे.
किमती वाढवण्यापूर्वी ग्राहकांचा विचार करा
जर तुम्हाला एखाद्या उत्पादनाची किंमत वाढवायची असेल तर जास्त पैसे देताना ग्राहकाला जास्तीच्या पैशाच्या मोबदल्यात उत्तम सेवा मिळाल्याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे. किमतीच्या बदल्यात मिळालेल्या मूल्यावर आधारित खरेदीचे निर्णय घेतले जातात. मूर्ती म्हणाले की, जेव्हा ग्राहक एखाद्या सेवेसाठी किंवा उत्पादनासाठी पैसे देतात, तेव्हा त्यांना तो योग्य निर्णय असल्याचे वाटले पाहिजे. पैशाच्या मोबदल्यात त्यांना चांगले मूल्य उत्पादन किंवा सेवा मिळाली आहे.
हेही वाचाः टाटा आणि एअरबस करणार माऊंट एव्हरेस्टवर उतरणाऱ्या एच १२५ हेलिकॉप्टरची निर्मिती
अनेक उत्पादने लोकांसाठी स्टेटस सिम्बॉल बनतात
नारायण मूर्तींचा हा सल्ला ग्राहकांच्या वर्तनाबद्दलची त्यांची सखोल समज दर्शवतो. अशी अनेक उत्पादने आणि सेवा आहेत, ज्या खरेदी करताना लोकांना अभिमान वाटतो. ही उत्पादने त्यांचे स्टेट्स दर्शवतात. लोक अनेकदा त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांच्या घरात ठेवलेले फ्रिज, फोन किंवा कोणत्याही ब्रँडचे घड्याळ दाखवतात. याचा त्यांना अभिमान वाटतो. लोकांना असे वाटते की, जर त्यांच्याकडे विशिष्ट फोन किंवा घड्याळ असेल तर ते त्यांना त्यांच्या सभोवतालच्या लोकांमध्ये एक विशेष दर्जा आणि प्रतिष्ठा प्रदान करते.
हेही वाचाः ८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!
उत्पादन मूल्यदेखील भावनिक असते
नारायण मूर्ती यांनी त्यांचे अनुभव शेअर करताना सांगितले की, उत्पादनाचे मूल्य केवळ पैशाच्या रूपात मोजता येत नाही. उत्पादन मूल्यही भावनिक असते. महात्मा गांधींचे उदाहरण देत मूर्ती म्हणाले की, आपण त्यांच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे. पारदर्शकता आणि सचोटीबद्दल ते बोलत असत. महात्मा गांधींकडूनही उद्योजकांनी धडा घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
IT चा वापर करून उत्कृष्ट सेवा प्रदान करा
याशिवाय मूर्ती म्हणाले की, सरकारी रुग्णालये करदात्यांच्या पैशाने बांधली जातात. त्यामुळे या रुग्णालयांचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने व्हायला हवे. लोकांना उत्तम सेवा मिळावी म्हणून आयटीचा वापरही वाढवला पाहिजे. कराचा पैसा अतिशय मेहनतीने आणि काळजीपूर्वक वापरणे ही समाजाची जबाबदारी आहे.