पीटीआय, नवी दिल्ली

नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड (एनसीईएल) संस्थेने आतापर्यंत ७ हजार कोटी रुपयांचे निर्यात करार केले आहेत. ही संस्था किमान नफ्यातील ५० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त म्हणून दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिली.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

एनसीईएलचे व्यापारचिन्ह, संकेतस्थळ अमित शहांच्या हस्ते सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, एनसीईएलची स्थापना २५ जानेवारीला झाली. सध्या संस्थेकडून सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या निर्यात करारांवर चर्चा सुरू आहे. सहकारी संस्थांना जागतिक निर्यात बाजारपेठेत पोहोचण्यासाठी संस्था मदत करीत आहेत. आंतरराष्ट्रीय उत्पादन घेण्याचे मार्गदर्शन संस्था करीत आहेत. देशभरात ८ लाख सहकारी संस्था असून, त्यांचे २९ कोटींहून अधिक सदस्य आहेत.

हेही वाचा… सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताचीच! केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या अहवालाचा दावा

संस्थेचे कार्यालय सध्या तात्पुरत्या ठिकाणाहून सुरू आहे. आम्ही मनुष्यबळाची भरती करीत आहोत. आतापर्यंत संस्थेने ७ हजार कोटी रुपयांचे निर्यात करार मिळविले आहेत. याचबरोबर १५ हजार कोटी रुपयांच्या करारांवर सध्या चर्चा सुरू आहे. ही संस्था सहकारी संस्थांच्या शेतकरी सदस्यांकडून किमान हमी भावाने शेतमाल घेऊन त्याची निर्यात करेल, असे शहा यांनी नमूद केले.

हेही वाचा… Maharashtra News Live: “गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!

एनसीईएलला होणाऱ्या एकूण नफ्यापैकी ५० टक्के शेतकरी सदस्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत. सध्या गहू, साखर अथवा दुधासाठी शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. यापुढे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त पैसे त्यातून मिळतील. – अमित शहा, केंद्रीय सहकार मंत्री

Story img Loader