मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मक कल आणि परदेशी निधीच्या ताज्या प्रवाहामुळे देशांतर्गत भांडवली बाजाराने शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात उच्चांकी दौड कायम राखली आहे. याबरोबरच देशांतर्गत आघाडीवर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यासारख्या ‘ब्लूचिप’ कंपन्यांमधील तेजीने निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले.

शुक्रवारी सलग नवव्या सत्रात रॅली करत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३१.१६ अंशांनी वधारून ८२,३६५.७७ या सर्वोच्च उच्चांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ५०२.०४ अंशांनी वधारून ८२,६३७.०३ या विक्रमी शिखरावर झेप घेतली होती. त्याजोडीला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८३.९५ अंशांची कमाई करत २५,२३५.९० या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. सलग १२ व्या सत्रात निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद झाला.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
reserve bank predict retail inflation at 4 9 percent for the fy25
महागाईचे चटके वाढणार; रिझर्व्ह बँकेचा चालू आर्थिक वर्षासाठी ४.९ टक्क्यांचा अंदाज
q2 gdp growth estimate may be revised upwards nageswaran
दुसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’त फेरउजळणीनंतर वाढ दिसणे शक्य -नागेश्वरन
bitcoin surges above 100000 usd for the first time in 2024
‘बिटकॉइन’ तेजीचे १ लाख डॉलरचे शिखर
sensex jump 110 points to settle at 80956 nifty gained 10 points to end at 24467
खासगी बँकांतील तेजीने ‘सेन्सेक्स’ची शतकी कमाई

हेही वाचा: भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार, मोठे गुंतवणूकदार (एचएनआय) आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) लार्ज कॅप कंपन्यांमध्ये चौफेर खरेदी केली आहे. शिवाय समभाग विक्रीचा मारा कमी केल्याने बाजारातील मंदीवाल्यांची पकड सैल झाली आहे. परिणामी बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचवण्यास हातभार लागला आहे, असे मत जिओजितचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले. तर टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्र आणि आयटीसीच्या समभागात मात्र घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी ३,२५९.५६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,६९०.८५ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

हेही वाचा: ‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबरला विलीनीकरण

सेन्सेक्स ८२,३६५.७७ २३१.१६ (०.२८%)
निफ्टी २५,२३५.९० ८३.९५ (०.३३%)
डॉलर ८३.८६ -३
तेल ८० ०.०८

Story img Loader