वृत्तसंस्था, बंगळूरु

साखळी चहापानगृहे ‘कॅफे कॉफी डे’ची पालक कंपनी कॉफी डे ग्लोबलच्या दिवाळखोरी प्रक्रियेला राष्ट्रीय कंपनी कायदा न्याधिकरणाच्या (एनसीएलटी) बंगळुरू खंडपीठाने सोमवारी मंजुरी दिली. करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सुरू टाळेबंदीतून बसलेल्या आर्थिक आघातातून कंपनी सावरता न आल्याचेच यातून स्पष्ट होते.

Uttar Pradesh News Denied petrol
Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं? (फोटो सौजन्य @freepik)
Coffee Benefits : कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Same Sex marriage
Same Sex Marriage : “समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच”, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; नेमकं कारण काय?
Bihar Politics
Bihar Politics : प्रशांत किशोर ‘बीपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी मैदानात, पण बिहारमधील नितीश कुमार सरकार आंदोलनाबाबत एवढं बेफिकीर का?
Mumbai Highcourt
Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

इंडसइंड बँकेने याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायाधिकरणाने सोमवारी तोंडी आदेश दिला आहे. या बाबतचा सविस्तर आदेश वृत्तसंस्थेच्या हाती अद्याप आलेला नाही. कॉफी डे एंटरप्रायजेस या सूचिबद्ध कंपनीची कॉफी डे ग्लोबल ही उपकंपनी आहे. कंपनीच्या डोक्यावरील इंडसइंड बँकेचे कर्ज ३१ मार्च २०२२ अखेरीस ६७.३ कोटी रुपये होते. कंपनीवरील वाढत्या कर्जभाराच्या धसक्याने, जून २०१९ मध्ये तिचे संस्थापक प्रवर्तक व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तो धक्का ताजा असताना, मार्च २०२० पासून सुरू झालेल्या करोना टाळेबंदीने कंपनीवरील संकटाला आणखी गहिरे रूप प्रदान केले.

हेही वाचा – देशात १.२३ कोटींहून अधिक प्रवाशांचा उड्डाण योजनेअंतर्गत विमानांमधून प्रवास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडसइंड बँक आणि कंपनी यांच्यात तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाने याप्रकरणी दिवाळखोरी प्रक्रियेला मंजुरी दिली. कॉफी डे ग्लोबलच्या वार्षिक ताळेबंदानुसार, कंपनीची १५८ शहरांत ४९५ कॅफे कॉफी डे उपाहारगृहे कार्यरत आहेत. याचबरोबर अनेक कंपन्या आणि हॉटेलांमध्ये तिची एकूूण ३८ हजार ८१० कॉफी व्हेंडिंग यंत्रे आहेत. कंपनीच्या डोक्यावरील एकूण कर्जभार मार्च २०२२ अखेरीस ९६० कोटी रुपये होते.

हेही वाचा – ६.५ कोटी EPFO सदस्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएफ खात्यावर जमा होणार ८.१५ टक्के व्याजदर

सेबीनेही केली होती कारवाई

भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने कॉफी डे एंटरप्रायजेस कंपनीला यावर्षी जून महिन्यात २६ कोटी रुपयांचा दंड केला होता. उपकंपन्यांतील निधी प्रवर्तकांशी निगडित कंपन्यांमध्ये वळविल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला होता. कॉफी डे एंटरप्रायजेसच्या सात उपकंपन्यांतील ३,५३५ कोटी रुपये प्रवर्तकांशी निगडित म्हैसूर अमलगमाटेड कॉफी इस्टेट या कंपनीत वळविण्यात आले होते.

Story img Loader