World Economic Forum : येत्या ५ वर्षांत रोजगार बाजारपेठेत (Jobs Markets) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, येत्या पाच वर्षांत ग्लोबल जॉब मार्केटवर संकटाचे ढग दाटलेले पाहायला मिळणार आहेत. मात्र असे असले तरी भारतीय जॉब मार्केटसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जागतिक जॉब मार्केटच्या तुलनेत भारतीय जॉब मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांत सरासरीपेक्षा कमी अस्थिरता दिसून येईल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच प्रसिद्ध केलेल्या “फ्यूचर ऑफ जॉब्स” अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. भारतीय जॉब मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये २२ टक्के उलथापालथ होईल, जे जागतिक रोजगार बाजाराच्या २३ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे.
२०२७ पर्यंत ६९ दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील
WEF च्या अहवालानुसार, २०२७ पर्यंत ६९ दशलक्ष म्हणजेच ६.९० कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील, तर ८३ दशलक्ष (८.३० कोटी) नोकऱ्या संपण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे पाहिले तर सुमारे १४ दशलक्ष (१.४० कोटी) नोकऱ्या कमी होतील. हे सध्याच्या नोकऱ्यांच्या प्रमाणाच्या २ टक्के इतके आहे.
हेही वाचाः आतापर्यंतचे ऐतिहासिक जीएसटी संकलन; एप्रिलमध्ये १.८७ लाख कोटी रुपये जमा
काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढतील, तर…
रोजगार बाजारपेठेतील उलथापालथीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग आणि डेटा सेगमेंटचा सर्वात मोठा वाटा असणार आहे. काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढतील, तर असे अनेक क्षेत्रे आहेत, जिथे नोकऱ्या कमी होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (३८ टक्के), डेटा विश्लेषक आणि शास्त्रज्ञ (३३ टक्के), आणि डेटा एन्ट्री क्लर्क (३२ टक्के) यांनी २०२७ पर्यंत जागतिक रोजगार बाजारात नोकऱ्या निर्माण करणे अपेक्षित आहे. याउलट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमध्ये नोकऱ्या वाढल्यामुळे काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्या कमी होतील. यापैकी लेखापाल आणि लेखा परीक्षक (accountant and auditor) ५ टक्के, ऑपरेशन मॅनेजर १४ टक्के आणि कारखाना कामगार (Factory workers) १८ टक्के यांना सर्वाधिक नोकऱ्या गमवाव्या लागतील.
हेही वाचाः अमेरिकेतील आणखी एक बँक बंद; जे पी मॉर्गन आता फर्स्ट रिपब्लिक बँकेची संपत्ती ताब्यात घेणार