देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन सप्टेंबरच्या मध्यापर्यंत वार्षिक तुलनेत २३.५१ टक्क्यांनी वाढून ८.६५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. विशेषत: कंपन्यांकडून यंदा जास्त जमा करण्यात आलेल्या अग्रिम कराने एकूण संकलन वाढले असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.

एकंदर जमा झालेल्या ८,६५,१७७ कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात (१६ सप्टेंबरपर्यंत), कंपनी प्राप्तिकर ४,१६,२१७ कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकरासह, रोखे उलाढाल कराच्या (एसटीटी) रूपाने ४,४७,२९१ कोटी रुपये समाविष्ट आहेत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जमा केल्या जाणाऱ्या अग्रिम कराच्या दुसऱ्या हप्त्यांच्या रूपात एकूण ३.५५ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील २.९४ लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे. १६ सप्टेंबरपर्यंत संकलित ३.५५ लाख कोटी रुपयांच्या अग्रिम करात कंपनी प्राप्तिकर २.८० लाख कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकराचा वाटा ७४,८५८ कोटी रुपये असा आहे. या तारखेपर्यंत सुमारे १.२२ लाख कोटी रुपये परतावा (रिफंड म्हणून करदात्यांना वितरित करण्यात आले आहेत.

retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra Govt
Tax On Liquor : महाराष्ट्रातील मद्यप्रेमींवर महसूल वाढवण्याची जबाबदारी! रिकामी तिजोरी भरण्यासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत
GDP growth likely to be limited to 6 3 percent ​​State Bank print eco news
जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
land will be returned to farmers
कर थकविल्याने शासनजमा जमिनी शेतकऱ्यांना परत
Indian rupee fall by 85 79 rupees
रुपयाची झड ८५.७९ पर्यंत
bmc collected 68 percent property tax in nine months
६८ टक्के मालमत्ता कर वसूल; नऊ महिन्यांत ५ हजार ८४७ कोटी मालमत्ता कर संकलन

विद्यमान २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सकल प्रत्यक्ष कर संकलन ९.८७ लाख कोटी रुपये आहे, जे मागील आर्थिक वर्षी याच कालावधीपर्यंत ८.३४ लाख कोटी रुपये होते. ज्यात चालू वर्षात आतापर्यंत १८.२९ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

Story img Loader