लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : विदेशातील मुख्यतः मॉरिशससारख्या करमुक्त छावण्यांमधील संस्थांच्या माध्यमातून अदानी कुटुंबीयांनी त्यांच्याच समूहातील काही कंपन्यांच्या समभागांचे मूल्य फुगवण्यासाठी गुंतवणूक केल्याचा शोध पत्रकारांची जागतिक संघटना ‘ओसीसीआरपी’ने नव्याने केलेला आरोप आणि त्याचे खंडन करणारा अदानी समूहाने खुलासा केल्यांनतरही, अदानींच्या समभागांत गुरुवारी मोठी घसरण झाली.
अमेरिकी संस्था हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांची नव्याने पुनरावृत्ती असलेल्या आरोपांचे वृत्तान्त ‘फायनान्शियल टाइम्स’ आणि ‘गार्डियन’ने प्रसिद्ध केले आणि गुरुवारी बाजार खुले होण्याआधी सकाळी त्या वृत्तान्ताचा हवाला देणाऱ्या बातम्या भारतात पसरल्या. परिणामी, भांडवली बाजारात अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग धाडकन कोसळले. गुरुवारच्या सत्रात अवघ्या काही तासांत कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल त्यामुळे ३५,६०० कोटींनी गडगडले.
आणखी वाचा-स्वतःच्याच समभागांचे मूल्य फुगवण्यासाठी अदानी कुटुंबियांची विदेशी संस्थांमार्फत गुंतवणूक
अदानी समूहाच्या भांडवली बाजारातील दहा सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल १०,८४,६६८ कोटी रुपयांवरून घसरून १०,४९,०४४ कोटींवर स्थिरावले. त्यात एकाच सत्रात सुमारे ३५,६२४ कोटींची घसरण झाली. यापैकी अदानी एंटरप्रायझेसला सर्वाधिक झळ बसली, त्याचे बाजारमूल्य ९,५७०.३१ कोटी रुपयांनी घसरले तर अदानी ग्रीन एनर्जीचे भांडवल ६,२०० कोटी रुपयांनी खाली आले. त्यापाठोपाठ अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवरचे बाजारभांडवल ५,००० ते ५,३०० कोटींनी घटले. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या बाजारमूल्याला सुमारे.३००० कोटींचा तर अंबुजा सिमेंटला २,६८० कोटी रुपयांचा फटका बसला.
चालू वर्षात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अदानी समूहावरील लबाडी आणि अनियमिततांचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाच्या प्रसिद्धीनंतर, अदानींच्या समभागांना अशीच घसरण कळा लागली होती. हिंडेनबर्गच्या अहवालात भारतातील या अग्रणी उद्योग समूहाने अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेख्यांमध्ये खोटेपणा करण्यासह, समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमती फुगवण्यासाठी अनेक लबाड्या केल्याचे आरोप केले होते. ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी)’ हे शोध पत्रकारांचे जागतिक जाळे असून, त्याला जागतिक आघाडीचे गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांचे आर्थिक पाठबळ आहे, त्याने अदानी समूहाच्या या समभाग गुंतवणुकीच्या व्यवहारावर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कंपनी समभागाचा भाव घसरण
अदानी टोटल गॅस ६३५.८० -१६.६५ (-२.५५ टक्के)
अदानी ग्रीन एनर्जी : ९२८.६५ – ४१.८५ (-४.३१ टक्के)
अदानी इंटरप्रायझेस २,४१९.२५ -९३.८५ (-३.७३ टक्के)
अदानी पोर्ट्स ७९२.२० -२६.५० (-३.२४ टक्के)
अदानी विल्मर ३५९.५० -९.४५ (-२.५६ टक्के)
अदानी पॉवर ३२१.३० -७.१० (-२.१६ टक्के)
अंबुजा सिमेंट ४२८.४० -१५.६५ (-३.५२ टक्के)
एनडीटीव्ही २१४.३० -४.८० (२.१९ टक्के)
अदानी एनर्जी सोल्युशन्स ८११.९५ -२९.५५ (-३.५३ टक्के)
(मुंबई शेअर बाजारातील गुरुवारचा बंद भाव)