नवी दिल्ली : बेधुंद तेजीच्या शिखरावर पोहोचलेल्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांत घसरणीसरशी नवीन डिमॅट खाते उघडण्याचे प्रमाण घसरल्याचे निदर्शनास येत आहे. डिमॅट खात्यांची एकूण संख्या वाढत असली तरी नवीन खाते उघडण्याचा वेग मंदावला असून, त्याने १४ महिन्यांचा नीचांकी तळ गाठला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरलेल्या जानेवारीमध्ये, २८.३ लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. नोव्हेंबर २०२३ नंतरची नीचांकी पातळी आहे. हा आकडा २०२४ मधील मासिक सरासरी ३८.४ लाखांच्या वाढीपेक्षाही कमी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ३२.६ नवीन डिमॅट खात्यांची भर पडली होती. भारतात सध्या कार्यरत असलेल्या एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांना डिमॅट खाते उघडता येते. जानेवारीअखेरपर्यंत एनएसडीएल आणि सीडीएसएलमध्ये नोंदणीकृत एकूण डिमॅट खात्यांची संख्या १८.८१ कोटी होती, जी मागील महिन्यात १८.५३ कोटी नोंदवली गेली होती.

ऑक्टोबरपासून, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी सुमारे ८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १२.८ टक्के आणि १२.२ टक्के घट झाली आहे.

करोना काळानंतर शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी अनुभवायला मिळाली, ज्यामुळे बाजारात नवीन गुंतवणूकदारांची लाट आली. परिणामी अनेक तरुण गुंतवणूकदार कमाईचे मुख्य साधन म्हणून शेअर बाजाराकडे वळले. मात्र ऑक्टोबरपासून, बाजार घसरण सुरू झाली. शिवाय बाजार तेजीला बहराचे कोणतीही स्पष्ट चिन्हे नाहीत, असे निरीक्षण असित सी मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्स लिमिटेडचे संस्थात्मक संशोधन प्रमुख सिद्धार्थ भामरे यांनी नोंदवले.