Amazon Pay 2000 Rupees Notes : ऑनलाइन शॉपिंग कंपनी अ‍ॅमेझॉनने आता ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरदरम्यान ग्राहक आता २००० रुपयांच्या नोटांचा वापर करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही दरमहा ५० हजार रुपये जमा करू शकता

ग्राहक २००० रुपयांच्या नोटांसह दरमहा ५०,००० रुपयांपर्यंत रोख जमा करू शकतात. Amazon Pay डोअरस्टेप सेवेद्वारे ग्राहकांकडून रोख रक्कम गोळा करेल आणि ती त्यांच्या Amazon Pay बॅलन्समध्ये जोडेल. जर दुकानात पेमेंटसाठी २००० रुपयांची नोट स्वीकारली जात नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर देताना तुम्ही २००० रुपयांची नोट Amazon डिलिव्हरी एजंटकडे सुपूर्द करू शकता.

२००० रुपयांच्या नोटांचे वितरण बंद झाले

आरबीआयने १९ मे रोजी एक आदेश जारी केला होता की, आता लोकांकडे असलेल्या २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करता येतील किंवा बदलून घेता येतील.

हेही वाचाः विश्लेषण : सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक गाठला; आता गुंतवणूकदारांना कसा फायदा होणार?

ग्राहकांना काय फायदा होणार?

Amazon Pay च्या ‘Cash Load at Doorstep’ सेवेअंतर्गत KYC झालेल्या ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरदरम्यान त्यांच्या Amazon Pay बॅलन्समध्ये अ‍ॅड करण्यासाठी डिलिव्हरी एजंटला अतिरिक्त रोख देऊ शकतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना Amazon अ‍ॅपवर व्हिडीओ KYC पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्याला अंदाजे ५-१० मिनिटे लागतात आणि त्यांच्या पुढील कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरदरम्यान ते फक्त चलनी नोट्स डिलिव्हरी एजंटला देऊ शकतात. त्यानंतर लगेच अद्ययावत करून ग्राहकांच्या Amazon Pay बॅलन्समध्ये पैसे दिसणे सुरू होईल.

हेही वाचाः पाच वर्षांत ५७ टक्के युजर्स ५जी सेवेकडे वळले; ग्राहकसंख्या वर्षाअखेरपर्यंत एक कोटींवर, एरिक्सनचा अहवाल

तुम्ही Amazon Pay ने पैसे देऊ शकता?

ग्राहक स्टोअरमध्ये कोणताही QR कोड स्कॅन करून कोणत्याही फोन नंबर/व्यक्तीला पैसे पाठवू शकतात किंवा त्यांच्या आवडत्या ऑनलाइन अ‍ॅप्सवर पैसे देऊ शकतात, हे सर्व Amazon Pay च्या 24×7 सुविधा आणि सुरक्षिततेसह उपलब्ध आहे. Amazon Pay ची ही डोअरस्टेप टॉप अप सेवा भारतातील आमची एक अद्वितीय सेवा आहे, जी संपूर्ण KYC पूर्ण केलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New facility for customers from amazon pay now 2000 rupee note can be topped up in digital wallet vrd