पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्र सरकारने क्यूआर कोड वैशिष्ट्यासह नवीन पॅन २.० कार्डची मंगळवारी घोषणा केली. प्राप्तिकराचे ‘कायमस्वरूपी खाते क्रमांक’ असणाऱ्या विद्यमान पॅन कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी या १,४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यमान पॅन कार्डचे अद्ययावत रूप असलेले क्यूआर कोडचा अंतर्भाव असलेले नवीन पॅन कार्ड हे करदात्यांना मोफत दिले जाणार आहे. पॅन हा भारतीय करदात्यांना प्राप्तिकर विभागाने दिलेला ‘अक्षर-सांख्यिकीय’ दहा-अंकी संच आहे. नवीन पॅन २.० कार्ड मोहिमेची घोषणा करण्यात आली असली तरी सध्याचा पॅन क्रमांक वैध राहणार असून तो बदलण्याची गरज नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

हेही वाचा >>>बाह्य कर्जांविना वाढ साधण्याचा अदानी समूहाचा दावा; गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी आर्थिक सुस्थितीची ग्वाही

आर्थिक व्यवहारांसाठी तसेच प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असलेल्या दस्तऐवजांपैकी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्राप्तिकर विभाग करदात्याच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पॅनचा वापर करते. करदात्यांची नोंदणी सेवा विस्तारण्याच्या उद्देशाने आता या प्रकल्पावर सरकार १,४३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. सुधारित पॅन कार्डावर क्यूआर कोड असणार आहे. ज्यामुळे संपूर्ण ऑनलाइन कामकाज अधिक सक्षम होईल. संपूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. याचा प्राप्तिकर विभागाबरोबरच, करदात्यांनादेखील फायदा होणार आहे. या नवीन प्रकल्पामुळे विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येईल.