मुंबई: नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (यूपीआय) ऑक्टोबर महिन्यात ऐतिहासिक विक्रमी व्यवहाराचा टप्पा गाठला. सणोत्सवाच्या महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून तब्बल १६.५८ कोटींहून अधिक व्यवहार पार पडले आहेत. ज्याचे व्यवहार मूल्य अभूतपूर्व २३.५ लाख कोटी रुपयांची पातळी गाठणारे आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने शुक्रवारी दिली.

याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये १५.०४ अब्ज असे एका महिन्यांतील व्यवहारांचे प्रमाण होते. तर जुलै महिन्यात तोपर्यंतचे सर्वोच्च २०.६४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले होते. मात्र सणासुदीचा हंगाम असल्याने ‘यूपीआय’ माध्यमातून प्रथमच, विक्रमी २३ लाख कोटी रुपये मूल्याच्या, १६ अब्ज व्यवहारांचा आकडा गाठला गेला. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये व्यवहार संख्येत (व्हॉल्युम) १० टक्के आणि मूल्यात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘एनपीसीआय’कडून प्रसृत आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये २०.६१ लाख कोटी रुपये मूल्याचे १४.९६ अब्ज ‘यूपीआय’ व्यवहार पार पडले होते.

GST Collection in October 2024
GST Collection in October 2024: जीएसटी संकलन ऑक्टोबरमध्ये १.८७ कोटींवर, सहामाही उच्चांकी स्तर
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा :Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग

ऑक्टोबर महिन्यात दिवसाला सरासरी ७५,८०१ कोटी रुपयांचे ५३.५ कोटी व्यवहार पार पडले. त्याआधीच्या सप्टेंबर महिन्यात ५०.१ कोटी व्यवहार पार पडले होते आणि त्यांचे मूल्य ६८,८०० कोटींच्या घरात जाणारे होते. सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात व्यवहार संख्येत ४५ टक्के, तर मूल्यात ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सध्या यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. रोकडरहित अर्थात कॅशलेस अर्थव्यवस्था बनण्यामागे यूपीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा : Bandhan Bank: बंधन बँकेची सूत्रे पार्था प्रतिम सेनगुप्ता यांच्याकडे

आयएमपीएस, फास्टॅग व्यवहारातही वाढ

याचबरोबर ‘इमिजिएट पेमेंट सर्व्हिस’ अर्थात ‘आयएमपीएस’ या ऑनलाइन आंतरबँक निधी हस्तांतरणाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात ४६.७ कोटी व्यवहार पार पडले, त्यांचे मूल्य ६.२९६ लाख कोटी रुपये होते. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल बूथवर स्वयंचलित टोल संकलनाची सुविधा देणाऱ्या फास्टॅगने सप्टेंबरमधील ३१.८ कोटी व्यवहारांच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ८ टक्के वाढ नोंदवली. या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात ६,११५ कोटी रुपयांचे संकलन झाले, जे आधीच्या सप्टेंबरमध्ये ५,६२० कोटी रुपये होते.