गौतम अदाणी यांच्या समूहाची कंपनी अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की, उपकंपनी Udanvat Leasing IFSC Limited ची संपूर्ण मालकी त्यांच्याकडे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अदाणी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी विमानाची मालकी आणि भाडेतत्त्वाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील गांधीनगर येथे असणार आहे, जिथे कंपनीकडून अद्याप कामकाजाला सुरुवात झालेली नाही. कंपनीचे अधिकृत भागभांडवल २.५ कोटी रुपये आहे. त्याचे २५,००,००० शेअर्स १० रुपये प्रति स्टॉकच्या किमतीवर विभागले गेले आहेत.

हेही वाचाः Money Mantra : सोन्याचा भाव कसा ठरवला जातो? त्याचा इतिहास जाणून घ्या

अदाणी समूह विमान उद्योगातही सक्रियपणे काम करीत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अदाणी समूहाने अदाणी एव्हिएशन फ्युएल लिमिटेडची स्थापना केली होती. ही उपकंपनी इंधनाचा सोर्सिंग, वाहतूक, पुरवठा आणि व्यापारात गुंतण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. अदाणी समूहाचा या क्षेत्रातील व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करण्यावर भर आहे.

हेही वाचाः सणासुदीच्या काळातच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; DA मध्ये वाढ केली जाहीर

अदाणी पोर्ट शेअर्सची सध्याची स्थिती

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी अदाणी समूहाची कंपनी अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स २.८५ टक्क्यांनी घसरले आणि प्रति शेअर ७७१ रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच दिवसांत हा शेअर ४.९५ टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय एका महिन्यात हा शेअर ६.६२ टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स सोमवारी ३.७१ टक्क्यांनी घसरले आणि प्रति शेअर २३०४ रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच दिवसांत हा शेअर ६ टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी अदाणी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स ३ ते ६ टक्क्यांनी घसरले होते. अदाणी समूहाने भारतातील अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवला आहे. अदाणी समूह बंदरांपासून नवीन ऊर्जापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेला आहे. याव्यतिरिक्त समूह अनेक उपकंपन्यांद्वारे अनेक व्यवसाय चालवतो आहे.