मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी निष्क्रिय आणि दावा न केलेल्या म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदार खात्यांचा (फोलिओ) माग घेण्यासाठी स्वतंत्र सेवा मंच कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रिव्हल असिस्टंट (एमआयटीआर)’ या नावाचा प्रस्तावित सेवा मंच म्युच्युअल फंडांच्या निबंधक आणि हस्तांतरण सेवा मंचांकडून (आरटीए) विकसित केला जाईल, असे सेबीने म्हटले आहे. प्रस्तावित मंच गुंतवणूकदारांकडून विस्मरण झालेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेण्यास, सध्याच्या नियमांनुसार ‘केवायसी’ तपशील अद्ययावत करण्यास आणि फसवणूक करून निधी हडपला जाण्याचा धोका कमी करण्यासाठी ते मदतकारक ठरेल. बँकिंग क्षेत्रातील दाव्याविना पडून राहिलेल्या ठेवींचा मागोवा आणि खात्यांमधील रकमेचा तपशील खातेदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेदेखील नुकतेच संकेतस्थळ विकसित केले आहे.

हेही वाचा >>>घाऊक महागाईतही घसरण; नोव्हेंबरमध्ये तीन महिन्यांतील नीचांकावर

सेबीच्या मते, अनेक वर्षांमध्ये, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नियमितपणे त्यांच्या गुंतवणुकीचा पाठपुरावा करण्यास विसरतात किंवा एखाद्या व्यक्तींच्या निधनानंतर त्याने नामनिर्देशन केले नसल्यास त्या व्यक्तीच्या वारसदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत माहिती मिळत नाही. सेबीने या प्रस्तावित प्रक्रियेबाबत ७ जानेवारीपर्यंत सार्वजनिकरीत्या अभिप्राय मागविले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New website to be launched for mutual fund folios print eco news amy