रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या एजीएमला संबोधित केले. एजीएममध्ये त्यांनी NMACC आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले. यादरम्यान सर्वांचे लक्ष नीता अंबानी यांच्या साडीकडे वेधले गेले होते. नीता अंबानी यांनी इकबाल अहमद यांनी हाताने डिझाइन केलेली बनारसी साडी परिधान केली होती. ही बनारसी ब्रोकेड साडी होती, जी सिल्कपासून विणलेली होती. त्यात बर्फी बुटी आणि पारंपरिक जरीचे काम केलेले होते, जे भारतीय कलेची विविधता दाखवणारे होते.

रिलायन्स फाऊंडेशन बनारसी विणकामाला प्रोत्साहन देते

रिलायन्स फाउंडेशन त्यांच्या ‘स्वदेश’ कार्यक्रमांतर्गत अनेक प्रादेशिक कलांना मदतीचा हात देत असते. बनारसी विणकामदेखील त्यापैकीच एक आहे. भारतातील पारंपरिक कला आणि हस्तकलेचे जतन, संवर्धन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचा हा उपक्रम आहे. अलीकडेच नीता अंबानी यांनी एका कार्यक्रमात अशा कला पिढ्यानपिढ्या पुढे नेल्याबद्दल आदरांजली वाहिली होती.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

हेही वाचाः मनरेगा कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, आधार पडताळणीची मुदत वाढवली

रिलायन्सची ४६ वी एजीएम ठरली विशेष

रिलायन्सची ४६ वी एजीएम सोमवारी मुकेश अंबानी यांनी बोलावली आहे. या बैठकीत रिलायन्सने कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. या बैठकीत नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचाः LPG Gas Price : सबसिडी नव्हे, तर ३० महिन्यांनंतर थेट गॅस सिलिंडरच स्वस्त, तुमच्या शहरातील किंमत काय?

यासह आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांचा कंपनीच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच मुकेश अंबानी यांचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा करण्यात आली. तसेच ४६ व्या एजीएममध्ये कंपनीने Jio Air Fiber सारख्या नवीन उत्पादनाची लॉन्च तारीख जाहीर केली. तसेच कंपनी Jio Cloud PC वर काम करीत असल्याचे सांगितले.