Nithin and Nikhil Kamath Salary : देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झेरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामत दरवर्षी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. याशिवाय नितीन कामत यांच्या पत्नी सीमा पाटील यांनाही २०२३ या आर्थिक वर्षात करोडो रुपयांचे मानधन मिळाले आहे. Entracker.com च्या रिपोर्टनुसार, या आर्थिक वर्षात Zerodha चे संस्थापक नितीन आणि निखिल कामत यांनी ७२-७२ कोटी रुपये मानधन घेतले आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये Zerodha च्या मंडळाने दोन्ही संस्थापकांना प्रत्येकी १०० कोटी रुपयांपर्यंत वेतन देण्यास मान्यता दिली होती.
एवढा पगार कर्मचाऱ्यांना मिळत आहे
संस्थापकांव्यतिरिक्त Zerodha ने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर ३८० कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये संचालकांच्या पगाराचाही समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांवर एकूण ६२३ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये हा खर्च ४५९ कोटी रुपये होता. या ६२३ कोटी रुपयांपैकी २३६ कोटी रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ESOPs वर खर्च करण्यात आले आहेत.
हेही वाचाः Money Mantra : RBIने नियम बदलले! १ लाख रुपयांच्या UPI ऑटो पेमेंटवर आता OTP लागणार नाही
नितीन कामत यांच्या पत्नीला एवढा मेहनताना मिळत आहे
केवळ नितीन आणि निखिल कामतच नाही तर कंपनी झेरोधा संचालक आणि नितीन कामत यांच्या पत्नी सीमा पाटील यांनाही या आर्थिक वर्षात मानधन म्हणून मोठी रक्कम देत आहे. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सीमा पाटील यांना ३६ कोटी रुपये मिळाले आहेत.
झेरोधाचे मूल्यांकन इतके आहे
फिनटेक कंपनी Zerodha ने २०२३ मध्ये स्वतःचे ३.६ अब्ज डॉलर म्हणजेच ३० हजार कोटी रुपयांचे मूल्यांकन केले आहे, जे कंपनीच्या वार्षिक नफ्याच्या १० पट आहे. २०२१ मध्ये कंपनीचे मूल्यांकन २ अब्ज डॉलर होते. ६५ लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्ते असलेली कंपनी सध्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर Groww चे नाव आहे, ज्याचे ६६.३० लाख सक्रिय वापरकर्ते आहेत.