Exchange Rs 2000 Notes at Punjab National Bank : आजपासून देशभरात २००० रुपयांच्या नोटा बदलण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) नोटा बदलण्यासंदर्भात काही निर्देश देण्यात आले आहेत. २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांना आधार कार्डची माहिती द्यावी लागणार नाही किंवा त्यांना कोणतेही अधिकृत व्हेरिफाईड दस्तऐवजही द्यावे लागणार नाहीत, असंही बँकेनं ट्विट करत स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीला बँकेच्या शाखेत २००० रुपयांच्या १० नोटा सहज बदलून मिळू शकतात. लोक पीएनबीच्या कोणत्याही शाखेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात, अशी माहिती PNB च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी त्यांना कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेच्या नावाने जुना फॉर्म ऑनलाइन प्रसारित केला जात होता. या पार्श्वभूमीवर बँकेने स्पष्टीकरण दिले आहे.

ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याच्या बँकांना सूचना

दरम्यान, कडक उन्हाचा तडाखा पाहता अर्थमंत्रालयाने सर्व बँकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी सावलीत उभे राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वित्त मंत्रालय आणि आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येस बँकेच्या मुंबईतील शाखेचे बँक मॅनेजर आफताबही नोटाबंदीसारखी परिस्थिती नसल्याचे सांगतात. तसेच कोणतीही दहशत नाही. लोक सामान्य मार्गाने येऊन नोटा बदलून घेत आहेत. तिथे फार मोठी रांग नसल्याचंही ते सांगतात.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?

हेही वाचाः अदाणी समूहामुळे एलआयसीला झाला मोठा फायदा, एका दिवसात ३३४७ कोटी कमावले

एसबीआयकडूनही सूचना जारी

याआधी शनिवारी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. लोकांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही ओळखपत्र पुरावा द्यावा लागणार नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत, असंही एसबीआयनं सांगितलं होतं. आरबीआयच्या सूचनेनुसार, २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा देशभरात बदलल्या जाणार आहेत, कारण त्या चलनातून बाहेर काढायच्या आहेत. त्यांची कायदेशीर निविदा स्थिती कायम आहे. खरं तर एखादी व्यक्ती एका दिवसात बँकेतून जास्तीत जास्त २०,००० रुपयांच्या नोटा बदलू शकते. त्याच्या बँक खात्यात कितीही नोटा जमा करता येतात.

हेही वाचाः एचडीएफसी बँकेनं २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची मर्यादा काढली; ग्राहकांना पाठवलेल्या मेलमध्ये सांगितलं…