Exchange Rs 2000 Notes at Punjab National Bank : आजपासून देशभरात २००० रुपयांच्या नोटा बदलण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) नोटा बदलण्यासंदर्भात काही निर्देश देण्यात आले आहेत. २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांना आधार कार्डची माहिती द्यावी लागणार नाही किंवा त्यांना कोणतेही अधिकृत व्हेरिफाईड दस्तऐवजही द्यावे लागणार नाहीत, असंही बँकेनं ट्विट करत स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीला बँकेच्या शाखेत २००० रुपयांच्या १० नोटा सहज बदलून मिळू शकतात. लोक पीएनबीच्या कोणत्याही शाखेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात, अशी माहिती PNB च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी त्यांना कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेच्या नावाने जुना फॉर्म ऑनलाइन प्रसारित केला जात होता. या पार्श्वभूमीवर बँकेने स्पष्टीकरण दिले आहे.
ना आधारची झंझट, ना कागदपत्रांची कटकट; SBI नंतर आता ‘या’ बँकेत २००० रुपयांच्या नोटा सहज बदलता येणार
Exchange Rs 2000 Notes at Punjab National Bank : २०००च्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांना आधार कार्डची माहिती द्यावी लागणार नाही किंवा त्यांना कोणतेही अधिकृत व्हेरिफाईड दस्तऐवजही द्यावे लागणार नाहीत, असंही बँकेनं ट्विट करत स्पष्ट केलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-05-2023 at 11:34 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No hassle of aadhaar no hassle of documents after sbi now one can easily exchange rs 2000 notes at punjab national bank vrd