FSSAI Guidelines for Festive Season : देशात सणांचा हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाईच्या खपात अनेक पटींनी वाढ होते. अशा परिस्थितीत येत्या हंगामात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. FSSAI ने दुकानदारांना या सणासुदीच्या काळात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करणे टाळण्याचा इशारा दिला आहे. याबरोबरच दुकानदारांना खाद्यपदार्थांच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचाः दिलासादायक बातमी! अमूलचे दूध सध्या महागणार नाही, ‘हे’ आहे कारण
दुकानदारांनी वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ पॅक करणे टाळावे – FSSAI
अन्न नियामक FSSAI ने देखील दुकानदारांना वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणे टाळण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाची माहिती देताना FSSAI चे CEO म्हणाले की, वर्तमानपत्रात पॅक केलेल्या अन्नामुळे अनेक आजारांचा धोका संभवतो. वर्तमानपत्रे बाहेर उघडी ठेवली जातात, त्यामुळे रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते.याशिवाय यामध्ये वापरण्यात येणाऱ्या शाईमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत FSSAI ने दुकानदारांना पॅकिंगसाठी वृत्तपत्राचा वापर तात्काळ थांबवण्याचा सल्ला दिला आहे. अन्न नियामकाने असेही म्हटले आहे की, ते दुकानदार आणि विविध संस्थांबरोबर अशा खाद्य कंटेनरच्या वापरावर भर देण्यासाठी काम करीत आहेत, जेणेकरून लोकांना सुरक्षित अन्न मिळू शकेल.
हेही वाचाः GeM पोर्टलद्वारे १० मिनिटांत SMEs ना १० लाखांचे कर्ज मिळणार, ‘या’ दिवशी योजना सुरू होणार
भेसळीवर कडक नजर राहणार
याबरोबरच FSSAI ने सणासुदीच्या आधी देशभरातील अनेक मिठाई उत्पादक संघटनांसोबत बैठक घेतली आहे. यामध्ये अन्न नियामकांनी सणासुदीच्या काळात विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. सणासुदीच्या काळात दूध, खवा, चीज, तूप इत्यादींचा वापर खूप वाढतो. याबरोबरच बाजारात भेसळयुक्त दुधाचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत FSSAI दुकानदारांना शुद्ध वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे.