नवी दिल्ली : आघाडीची एफएमसीजी कंपनी असलेल्या आयटीसी लिमिटेडमधील हिस्सेदारी ‘सुटी’मार्फत विकण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयातील गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (दीपम) विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी बुधवारी सांगितले. ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने अर्थात बॅटने बुधवारी आयटीसीचे सुमारे १७,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केल्यांनतर सरकारने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ढोलेरातून २०२६ मध्ये पहिली चिप निर्मिती; वैष्णव यांची माहिती; टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन

सरलेल्या वर्षात ३१ डिसेंबरअखेर स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाकडे (सूटी) आयटीसीची ७.८२ टक्के हिस्सेदारी आहे. दोन वर्षांपूर्वी ‘सूटी’मार्फत सरकारने दोन टक्के समभाग प्रत्येकी २९१.९५ रुपयांना विक्री केले होते.

‘बॅट’ने बुधवारच्या सत्रात ‘ब्लॉक डील’च्या माध्यमातून आयटीसीमधील ३.५ टक्के हिस्सेदारी विकली. यांनतर ‘बॅट’ची आयटीसीमधील हिस्सेदारी आता २९ टक्क्यांवरून २५.५ टक्क्यांवर आली आहे. ‘बॅट’व्यतिरिक्त, भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), परदेशी गुंतवणूकदार, किरकोळ गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड घराणे आणि स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हे आयटीसीचे इतर प्रमुख भागधारक आहेत.

हेही वाचा >>> रवींद्रन बैजू यांना न्यायालयाकडून दिलासा; भागधारकांच्या बैठकीतील निर्णयाला २८ मार्चपर्यंत स्थगिती

बाजार भांडवलात ३२ हजार कोटींची भर

आयटीसीचे समभाग बुधवारी तेजीत होते. हिस्साविक्रीच्या वृत्तानंतर तिचे बाजारमूल्य सुमारे ३२,१२७.११ कोटी रुपयांनी वधारले. मुंबई शेअर बाजारात आयटीसीचा समभाग ४.४५ टक्क्यांनी म्हणजेच १८ रुपयांनी वधारून ४२२.२५ रुपयांवर स्थिरावला. बाजार पडझडीत देखील कंपनीचे बाजारभांडवल सुमारे ३२ हजार कोटी रुपयांनी वाढून ५.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No plans to sell our stake in itc says dipam secretary print eco news zws