चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर आणि सरकारी अधिकारी व्हायचे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण बऱ्याचदा काही जणांची ही इच्छा पूर्ण होत नाही. विशेष म्हणजे डॉक्टर आणि सिव्हिल सर्व्हिस यांसारख्या पेशात आल्यानंतर आता जीवनाचा उद्देश पूर्ण झाला, असेही बहुतेकांना वाटते, पण एका माजी आयएएस अधिकारी असलेल्या रोमन सैनी यांनी ही धारणाच चुकीची असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. रोमन सैनी यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी डॉक्टरेट आणि नंतर वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते आयएएस अधिकारी बनले. पण करिअरच्या इच्छेपोटी त्यांनी आयएएसची नोकरी सोडून ट्यूशनचा व्यवसाय सुरू केला आणि बघता बघता १५ हजार कोटींची कंपनी स्थापन केली.

आयएएस अधिकारी ते यशस्वी उद्योगपती

ऑनलाइन ट्यूशन प्लॅटफॉर्म अनअकॅडमीचे सह संस्थापक रोमन सैनी हे राजस्थानचे आहेत. ज्यांनी आपली आयएएसची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि एड टेक प्लॅटफॉर्म अनअकॅडमी सुरू केली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी रोमन सैनी डॉक्टर होण्यासाठी एम्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. खरं तर ते इथेच थांबले नाहीत, त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि वयाच्या २२ व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रोमन सैनी मध्य प्रदेशात IAS अधिकारी म्हणून रुजू झाले.

Vasai rape case against five minor girls Accused life sentence upheld by High Court Mumbai news
वसई येथील पाच अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण: आरोपीची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nagpur, Music Teacher, nagpur school teacher beating srudent, Student Beating, Complaint, Education Officer, Deputy Chief Minister, School Education Minister,
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?
Anurag dead body, post-mortem, custody,
शवविच्छेदनानंतर अनुरागचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
central and state government introduce Unified Pension Scheme to its employee
विश्लेषण : जुन्या पेन्शनवर एकीकृत निवृत्तिवेतन योजनेचा पर्याय किती फायद्याचा?
naigaon school rape marathi news
बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती, ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार
Pune, Kondhwa, student death, cardiac arrest, school premises, 10th grader,
धक्कादायक ! दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
A student studying in 2nd is in stress after being beaten by the teacher in thane
शिक्षिकेच्या मारहाणीने दुसरीत शिकणारा विद्यार्थी तणावात; पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचाः ITC देशातील ७ वी सर्वात मोठी कंपनी म्हणून आली समोर, ‘या’ दिग्गज कंपनीला सोडले मागे

नोकरी सोडली आणि स्टार्टअप सुरू केले

रोमन सैनी आयएएस होऊनही समाधानी नव्हते आणि व्यावसायिक बनण्याच्या इच्छेने त्यांनी देशातील सर्वोच्च सरकारी नोकरी सोडली. २०१५ मध्ये प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी गौरव मुंजाल आणि हेमेश सिंग यांच्यासोबत अनअकॅडमीची स्थापना केली. एड टेक प्लॅटफॉर्म Unacademy चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल १५००० कोटींच्या पुढे गेली आहे. हे ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हा स्टार्टअप सुरू करण्यामागचा उद्देश यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता, जेणेकरून त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागू नयेत. या उद्देशात रोमन सैनी आणि कंपनीचे इतर सह संस्थापक खूप यशस्वी झाले आहेत.

हेही वाचाः How to Get Easy Loan : क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास कर्ज घेणे होऊ शकते कठीण, ‘हे’ आहेत कर्ज मिळविण्याचे सोपे मार्ग