मोठ्या कॉर्पोरेशन्सपासून ते अत्याधुनिक स्टार्ट अप्सपर्यंत प्रत्येक उद्योगात महिला व्यवसाय मालक म्हणून भरभराट करीत आहेत. व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलेचे असेच एक उदाहरण म्हणजे हिना नागराजन. खरं तर महत्त्वाचे सांगायचे झाल्यास आता डियाजिओ इंडिया चालवणार्‍या महिलेचे नाव हिना नागराजन असून, ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या मद्य कंपन्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे त्या केवळ कंपनीच्या सीईओ नाही, तर व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… डियाजिओ इंडियाच्या प्रमुख या नात्याने त्या कंपनीचे नफा-तोटा ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अनुपालन आणि गुंतवणुकीपर्यंतचे काम पाहतात. भारतातील व्यवसाय प्रमुख होण्यापूर्वी हिना यांनी डियाजिओच्या आफ्रिका इमर्जिंग मार्केट क्षेत्राचे नेतृत्व केलेय.

३० वर्षांचा व्यवसाय चालवण्याचा अनुभव

हिना नागराजन यांची सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे डियाजिओपूर्वी त्यांनी FMCG क्षेत्रात सुमारे ३० वर्षे घालवली. त्यांनी Reckitt Benckiser ची मूळ कंपनी Reckitt, Mary Kay India आणि Nestle यांसारख्या कंपन्यांमध्ये नेतृत्व पदावर काम केले आहे. त्यांना २,७५,००,००० रुपये मूळ वेतन आणि २,५८,२६,८५० रुपयांचे भत्ते (BOA) देईल. त्यांचे वर्षभरातील पीएफ योगदान ३३,००,००० रुपये होते. त्यांना १३,२२,७५० रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. त्यांना वार्षिक सीटीसी ८ कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!

हेही वाचाः मोदी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या जलमूल्यांकन समितीमध्ये थेट अदाणींचा ‘माणूस’

अभ्यासातही अव्वल

बिझनेस चालवण्यात पारंगत असण्याबरोबरच हिना नागराजन यांनी अभ्यासातही टॉप केले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमची पदवी घेतली. त्यानंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. जुलै २०२१ मध्ये त्यांना Diageo चे MD आणि CEO बनवण्यात आले. यानंतरच डियाजिओने विजय माल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ताब्यात घेतली. ३२६१ कर्मचारी असलेल्या कंपनीच्या भारतातील कामकाजाचे त्या नेतृत्व करतात. युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडचे बाजार भांडवल ४१००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१६ पर्यंत विजय माल्ल्या या व्यवसायाची धुरा सांभाळत होते.

हेही वाचाः टाटा स्टील करणार नोकरकपात, ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

आयपीएल संघ मालक कंपनी

डियाजिओ इंडिया आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मालक कंपनी आहे. या संघाची एकूण संपत्ती ८५०० कोटी रुपये आहे. विराट कोहली दीर्घकाळ या संघाचा कर्णधार होता. तो अजूनही या संघाचा सदस्य आहे.

Story img Loader