फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर वस्तू विकणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रँड आणि काही व्यापारी भरपूर नफाही कमावत आहेत. कराबद्दल बोलायचे झाल्यास यापैकी बरेच लोक कर भरत नाहीत आणि देत असले तरी ते खूप कमी प्रमाणात भरतात. प्राप्तिकर विभागानं अशा लोकांची ओळख पटवली आहे. विभागाने १० हजार कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीची नोटीसही बजावली आहे. सध्या आयटी विभागाने पॅन इंडिया ब्रँड्सना ४५ नोटिसा पाठवल्या आहेत. अनेक नोटिसा पाठवायचे आहेत. प्राप्तिकर विभाग आणि सरकारने कोणत्याही परिस्थितीत करचोरी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. गेल्या काही काळापासून करचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे सरकारच्या कर संकलनातही वाढ होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊ यात.
प्राप्तिकर विभागाने १०००० कोटी रुपयांची करचोरी पकडली
ईटीच्या अहवालानुसार, देशात सुरू असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांसह आयटी विभाग सोशल मीडिया वस्तूंच्या विक्रेत्यांवर बारीक नजर ठेवून आहे. या विभागाने सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या करचोरीचा पर्दाफाश केला आहे. ही करचोरी सुमारे ३ वर्षांपासून केली जात होती. विभागाने ४५ नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १५ नोव्हेंबरदरम्यान पाठवण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही फक्त सुरुवात आहे. अद्याप अनेकांना नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत.
हेही वाचाः सॅम ऑल्टमन OpenAI मध्ये परतले; कंपनीनं सोशल मीडियावर केली घोषणा
सोशल मीडियावर हे सामान विकत होते
ईटीच्या अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत किंवा पाठवल्या जाणार आहेत, त्यापैकी एकही मोठी ई-कॉमर्स कंपनी नाही. विभागाने ४५ नोटिसा पाठवल्या असून, त्यापैकी १७ नोटिसा कपडे विकणाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. ११ दागिने विक्रेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. चपला आणि पिशव्या विकणाऱ्यांना ६ नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. स्थानिक फॅशन उत्पादनांच्या ५ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. घराच्या सजावट आणि फर्निचरच्या ४ लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. उरलेल्या नोटिसा जे ई-टेलर्स भेट वस्तू विकतात त्यांना बजावण्यात आले आहे. आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार, या यादीत काही किरकोळ विक्रेत्यांची नावे आहेत जे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. विभागानुसार असे अनेक विक्रेते आहेत जे आपली उत्पादने परदेशातही पाठवत आहेत.
महामारीनंतर ऑनलाइन विक्रीत वाढ
देशात मोठी लोकसंख्या आहे. त्यानुसार देशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म न वापरणाऱ्यांचीही संख्या आहे. जर आपण इंस्टाग्रामबद्दल बोललो तर त्याचे देशात सुमारे २३ कोटी वापरकर्ते आहेत, जे जगातील सर्वात जास्त आहे. तर फेसबुक वापरकर्त्यांची संख्याही ३१.४० कोटींहून अधिक आहे. कोविड महामारीनंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वस्तू विकण्याचा ट्रेंड लक्षणीय वाढला. त्यांच्या व्यवसायात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या ४५ कंपन्यांची उलाढाल खूपच चांगली असल्याचे सांगितले जाते.
२ टक्के उत्पन्न देखील दाखवले नाही
माहिती देताना अधिकाऱ्यांनी ईटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनेक दुकानदार त्यांच्या कमाईच्या २ टक्के रक्कमही आयटी विभागाला कळवत नाहीत. मुंबईतील एका ई-टेलरने फॅशन शो प्रायोजित केल्यावर ही बाब समोर आली. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, त्याचे एक छोटेसे दुकान आणि गोदाम आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करत होते. त्याची ११० कोटींची उलाढाल होती. रिटर्न भरण्याच्या वेळी ई-टेलरने आपली कमाई फक्त २ कोटी रुपये असल्याचे दाखवले.