महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून, याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठीदेखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फळबाग लागवडअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून, यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर केली. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचाः कांद्याच्या निर्यातशुल्कात वाढ करून ते ४०% करण्याचा मोदी सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा:- नाना पटोले

राज्य सरकारने ६ जुलै २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून, याअंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते.

हेही वाचाः जूनमध्ये भरपूर नोकऱ्या मिळाल्या, EPFO ​​डेटाने दिली दिलासादायक बातमी

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.