जगातील सर्वात मोठा ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्शन प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पाला आता उपग्रहाचा आधार मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने १.४ लाख कोटी रुपयांच्या या विशाल प्रकल्पाला नवे रूप देण्याची तयारी चालवली आहे. या अंतर्गत उपग्रह कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान, फिक्स्ड वायरलेस एक्सेस (FWA) आणि फायबर लाइनचा वापर दुर्गम भाग आणि डोंगराळ भागांना हाय स्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी केला जाणार आहे. एकदा ही योजना मंजूर झाल्यानंतर Jio, Starlink आणि OneWeb सारख्या कंपन्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात आणि भारतनेटवर काम करू शकतात.

१० टक्के गावांना सुविधा देण्याची तयारी

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गम आणि डोंगराळ भागात येणाऱ्या १० टक्के ग्रामपंचायती उपग्रहाद्वारे इंटरनेटशी जोडल्या जातील. खासगी कंपन्यांबरोबरच बीएसएनएललाही सॅटेलाइट कम्युनिकेशन (सॅटकॉम) कंपन्यांशी हातमिळवणी करण्याची परवानगी मिळणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात काही ग्रामपंचायतींना ही सुविधा देण्यात आली होती. पण जिओ उपग्रह यासाठी योग्य आढळले नाहीत. आता नवीन प्रकारचे सॅटेलाइट तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Naxal-free, India, Naxalism, Naxal,
देशातील ६० जिल्हे नक्षलमुक्त ? जाणून घ्या, देशातील नक्षलवादाची स्थिती
E Challan Nagpur, Nagpur Traffic Police,
वाहन एकाचे, वाहतूक चालान दुसऱ्याला; नागपूर पोलिसांच्या प्रतापाने….
walking pneumonia incidence increasing in mumbai
विश्लेषण : मुंबईत ‘वॉकिंग न्युमोनिया’चा प्रादुर्भाव का वाढत आहे? लक्षणे काय? उपाय कोणते?
Huge Salary Opportunities, Cyber ​​Security,
पुण्यात सायबर सुरक्षा, ‘डेटा सायन्स’मध्ये गलेलठ्ठ पगाराच्या संधी! सर्वाधिक वेतन कोणत्या क्षेत्रात जाणून घ्या…
pune balajinagar metro station
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन

हेही वाचाः बजाज फिनसर्व्ह आणि स्माईल ट्रेन इंडिया ‘महा स्माइल्स’ उपक्रम राबवणार

पुढील महिन्यात निविदा येऊ शकतात

भारतनेट प्रकल्प हाताळणारी बीएसएनएल पुढील महिन्यात यासंदर्भात निविदा काढू शकते. याअंतर्गत कंपन्यांना फायबर केबल टाकण्याबरोबरच ऑपरेशन आणि मेंटेनन्सची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलपासून हे काम सुरू करण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसाठी कमी किमतीचे पर्याय शोधले जातील.

हेही वाचाः अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात; दिग्गज ई-कॉमर्स कंपनी आता ‘या’ विभागातील अनेकांना घरी बसवणार

१.६४ लाख गावे जोडली गेलीत

या प्रकल्पाच्या फेज १ आणि २ मध्ये देशातील १.६४ लाख गावांना इंटरनेट पुरवण्यात आले. पुढील टप्प्यात ४७ हजार नवीन ग्रामपंचायती जोडल्या जातील आणि सर्व जोडलेल्या गावांमध्ये इंटरनेट सेवा सुधारली जाणार आहे. ग्रामीण भागातील उद्योजक भारतनेटशी जोडले जातील. प्रकल्पांतर्गत त्यांना फायबर टू द होम (FTTH) कनेक्शन घेण्यासाठी ८९०० ते १२९०० रुपयांपर्यंतची मदतदेखील दिली जाईल. भारतनेट उद्योजक मॉडेल अंतर्गत बीएसएनएलला पाच वर्षांत १.५ कोटी फायबर कनेक्शन्स द्यायचे आहेत.

Story img Loader