पीटीआय, नवी दिल्ली

वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी होंडा कार्स इंडियाने एप्रिलपासून त्यांच्या सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यान्वयन खर्च आणि सुट्या भागांच्या किंमतवाढीमुळे होंडा कार्स इंडियाने हा निर्णय घेतला आहे, असे होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (विपणन आणि विक्री) कुणाल बहल यांनी बुधवारी सांगितले. किंमत वाढ वाहन प्रकारानुसार बदलेल. तसेच होंडा अमेझ, सिटी, सिटी ई:एचईव्ही आणि एलिव्हेटसह सर्व होंडाच्या वाहनांना किंमत वाढ लागू होईल. वाहनांच्या किमतीत नेमकी किती वाढ केली जाईल याबाबद्दल मात्र तपशीलवार माहिती देण्यात आली नाही.

तसेच ह्युंदाई मोटर इंडियाने एप्रिलपासून वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाची विद्यमान वर्षातील ही दुसरी वाढ आहे. कंपनीने जानेवारीमध्ये विविध श्रेणीतील वाहनांच्या किमतीमध्ये २५,००० रुपयांपर्यंत वाढ केली होती. मारुती सुझुकी इंडिया, किआ इंडिया आणि टाटा मोटर्स, मर्सिडीज यांनीही पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Story img Loader