Unique UPI-ATM: उद्योग विश्वास प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी UPI (Unified Payments Interface) अ‍ॅप्लिकेशनद्वारे काम करणार्‍या एका अद्भुत एटीएमचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिंद्रा यांनी ट्विटर प्लॅटफॉर्वर व्हिडीओ शेअर केला असून, ‘या’ जुगाडाला तंत्रज्ञानाला एक अद्भुत आविष्कार म्हटले आहे.

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, यूपीआय आधारित एटीएम नुकतेच मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित करण्यात आले. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी लिहिले, ‘UPI एटीएमचे ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ मध्ये अनावरण करण्यात आले. भारत ज्या वेगाने वित्तीय सेवांचे डिजिटायझेशन करीत आहे आणि त्यांना कॉर्पोरेट केंद्रित (क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी धोक्याची घंटा?) बनवण्याऐवजी ग्राहक केंद्रित बनवत आहे, तो आश्चर्यकारक आहे. (मी माझा मोबाईल फोन कुठल्याही चुकीच्या ठिकाणी ठेवणार नाही, याची मला फक्त खातरजमा करायची आहे!)’

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Lakshami Niwas
Video: लक्ष्मी सिद्धूला घरी बोलवणार, त्याची व भावनाची भेट होणार का? पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “सूर्याच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना…”, तुळजाच्या हाती लागणार शत्रूविरूद्ध पुरावा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये ट्विस्ट

हेही वाचाः २२० सभा, ६० शहरे अन् १५ दशलक्ष लोक, अशा प्रकारे जी २० देशाची अर्थव्यवस्था बदलणार

भारतातील पहिले UPI ATM

अलीकडेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने काल भारतातील पहिले UPI ATM लाँच केले. हे व्हाईट लेबल एटीएम (WLA) म्हणून लाँच केले गेले आहे. याद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय रोख रक्कम काढता येणार आहे. तसेच फिजिकल एटीएम ठेवण्याची गरजसुद्धा संपुष्टात येणार आहे. यामुळे काही बँकांच्या ग्राहकांना ‘क्यूआर आधारित कॅशलेस पैसे काढण्याचा’ आनंद घेता येईल, असा अनुभव मिळेल.

हेही वाचाः RRVL आणि कतार गुंतवणूक प्राधिकरणात करार पूर्ण, रिलायन्स रिटेलला ८२७८ कोटी मिळाले

UPI ATM मधून पैसे कसे काढायचे?

  • तुम्हाला काढायची असलेली रक्कम निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या रकमेशी संबंधित UPI QR कोड दाखवला जाईल.
  • QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे UPI अॅप वापरा.
  • व्यवहाराची खातरजमा करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा.
  • आता तुमची रोख रक्कम एटीएममधून बाहेर येईल.

Story img Loader