Lakshadweep-Maldives row: लक्षद्वीप पर्यटनाला चालना देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सुरू झालेला मालदीव वाद वाढतच चालला आहे. सरकार लक्षद्वीपला प्रोत्साहन देत असताना मालदीवचे पर्यटन क्षेत्र धोक्यात आले आहे. पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप चर्चेत आले आहे. लोक लक्षद्वीपला भेट देण्याचा बेत आखत आहेत. हा वाद ज्या प्रकारे वाढला आहे, त्यामुळे भविष्यात लक्षद्वीप हे पर्यटनाचे हॉट स्पॉट बनणार यात शंका नाही. त्यामुळेच टाटा समूहाने लक्षद्वीपबाबत मोठं पाऊल उचललं आहे. लक्षद्वीप बेटाला विशेष भेट देत टाटा समूहाने तेथे ताज-ब्रँडेड रिसॉर्ट्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. टाटा समूहाची इंडियन हॉटेल्स कंपनी लक्षद्वीपमध्ये हे रिसॉर्ट्स बांधणार आहे.

हेही वाचाः विश्लेषण: भारताच्या जीडीपीचे पहिले आगाऊ अंदाज: आकडे काय सांगतात?

टाटांचे मिशन २०२६

टाटाचा हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण होईल आणि त्याच वर्षीपासून तो लोकांसाठी खुलाही करण्यात येणार आहे. टाटा आयएचसीएलच्या वतीने ही हॉटेल्स विकसित करण्यात येणार आहेत. लक्षद्वीपमधील सुहेली आणि कदमत बेटांवर ही हॉटेल्स सुरू होणार आहेत. साहजिकच पर्यटकांची संख्या वाढली की, हॉटेल आणि पर्यटन उद्योगही वाढणार आहे. या टाटा हॉटेल्समध्ये पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था असणार आहे. सुहेली बेटाच्या ताज बीचमध्ये ११० खोल्या असलेले ६० व्हिला आणि ५० वॉटर व्हिला बांधण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर कदमत येथील ११० खोल्यांच्या ताज हॉटेलमध्ये ७५ बीच व्हिला आणि ३५ वॉटर व्हिला बांधण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी स्कुबा डायव्हिंग, विंडसर्फिंग, स्नॉर्केलिंग, सर्फिंग, वॉटर स्कीइंग अशा अनेक सुविधा असतील.

हेही वाचाः Money Mantra : नव्या वर्षात दर महिन्याला २०२४ रुपयांची SIP करा; २४ वर्षांत तुम्हाला १ करोड मिळणार; गणित समजून घ्या

चलो लक्षद्वीप मोहिमेला वेग

मालदीव वादादरम्यान चलो लक्षद्वीप भारतात खूप ट्रेंड करीत आहे. #चलो लक्षद्वीप मोहिमेला वेग आला आहे. लोक लक्षद्वीपला भेट देण्याचा विचार करीत आहेत. लक्षद्वीपच्या शोधात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे मोठ्या कंपन्या या संधीचे भांडवल करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. मालदीव-लक्षद्वीप वादात कंपन्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच टूर आणि ट्रॅव्हल प्लॅनिंग कंपनी इझी माय ट्रिपने मालदीवसाठी फ्लाइट रद्द केल्या आहेत आणि लक्षद्वीपसाठी स्वस्त टूर पॅकेजेस सादर केले आहेत. लक्षद्वीपकडे लोकांचा कल वाढत आहे, त्यामुळे या निमित्ताने कंपन्याही सक्रिय झाल्या आहेत.

Story img Loader