जगातील ४० टक्के तांदूळ निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारताचा एक निर्णय अमेरिकेपासून अरब देशांपर्यंत खळबळ माजवणार आहे. भारताने बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली ते तर तुम्हाला माहीत आहे. तेव्हा बासमती तांदळाच्या निर्यातीला यातून सूट देण्यात आली होती. मात्र जगात पुन्हा एकदा संकट ओढावू शकते, यासाठी भारताने काही खास बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्‍या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करून सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ बासमती तांदळाची निर्यात होणार नाही

मंत्रालयाने रविवारी एक अधिसूचना जारी केली की, आता प्रति टन १२०० डॉलरपेक्षा कमी किमतीचा बासमती तांदूळ देशातून निर्यात केला जाणार नाही आणि मंत्रालयाकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. भविष्यात APEDA चे अध्यक्ष अशा निर्यात करारांच्या तपासणीसाठी एक समिती स्थापन करतील, जी या करारांचे मूल्यांकन केल्यानंतरच निर्यातीस परवानगी देईल.

हेही वाचाः ‘मेरा बिल मेरा अधिकार’च्या माध्यमातून १ कोटीपर्यंतची बक्षिसे जिंकता येणार, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

यंदा देशात अवकाळी पाऊस, पूर आणि एल-निनोमुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन सरकारने गेल्या महिन्यात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र जगातील तांदळाच्या तुटवड्यात कमी पडण्याची भीती लक्षात घेऊन सरकारने आता निवडक बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने तुकड्यात असलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. गेल्या आठवड्यातच सरकारने नॉन बासमती तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लादले आहे. यासह भारताने आता गैर-बासमती तांदळाच्या सर्व जातींची निर्यात थांबवली आहे.

हेही वाचाः एका एकरासाठी १०० कोटी रुपये; २०२३ मधले मोठे जमीन व्यवहार

जगात खळबळ उडण्याची शक्यता

गेल्या महिन्यात भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तेव्हा अमेरिकेतील अनेक भागात तांदळाच्या काळ्या बाजाराचे व्हिडीओ समोर आले. किरकोळ दुकानांबाहेर लांबलचक रांगा दिसत होत्या, तर एका कुटुंबाला ९ किलो तांदूळाचा मर्यादित पुरवठा करण्याचा नियमही अनेक दुकानांनी लावला होता. तसेच दुबई आणि आखाती देशांमध्ये तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणि पुन्हा निर्यात केल्याच्या बातम्या आल्या. अशा स्थितीत बाजारातील बासमती तांदळाच्या निर्यातीवर अशा बंदीचा काय परिणाम होईल, हे अद्याप समोर आलेले नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now the export of basmati rice from india is also banned big decision of modi government vrd
Show comments