नव्या वर्षात अनेक कंपन्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी नोकर कपातीचा मार्ग अवलंबत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नवीन वर्षात नोकर कपातीचा ट्रेंड झपाट्याने सुरू झाला असून, अनेक नामांकित कंपन्या या यादीत सामील झाल्यात. तंत्रज्ञान जगापर्यंत पसरलेले नोकर कपातीचे ढग आता इतर क्षेत्रांतही पोहोचू लागले आहेत. ताज्या प्रकरणात भारतीय पोलाद कंपनी टाटा स्टीलने नोकर कपातीची घोषणा केली आहे.

दोन ब्लास्ट फर्नेस बंद करण्याचा निर्णय

टाटा स्टील आपल्या यूके युनिटमध्ये ही नोकर कपात करणार आहे. AP अहवालानुसार, टाटा स्टील आपल्या पोर्ट टॅलबोट स्टीलवर्क्स युनिटमधील दोन ब्लास्ट फर्नेस बंद करणार आहे. हे युनिट वेल्स ब्रिटनमध्ये आहे. दोन ब्लास्ट फर्नेस बंद पडल्याने कंपनीतील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत ‘त्या’ ३ हजार कर्मचाऱ्यांची नोकर कपात केली जाऊ शकते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

मात्र, कंपनीने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. कंपनीने नोकर कपातीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही किंवा कामगार संघटनेकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. टाटा स्टील शुक्रवारी आपल्या दोन ब्लास्ट फर्नेस बंद करण्याची घोषणा करेल, असा दावा एपीने केला आहे. त्याबरोबरच ब्लास्ट फर्नेस बंद झाल्यामुळे कोणकोणत्या कर्मचार्‍यांना फटका बसेल, याचीही माहिती कंपनी देणार आहोत.

हेही वाचाः तीन दिवसांच्या घसरणीनंतर आता शेअर बाजार सावरला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४ लाख कोटींची वाढ

ऑपरेशनमध्ये समस्या होती

दोन ब्लास्ट फर्नेस बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी टाटा स्टीलने कामगार संघटनेबरोबर बैठकही घेतली. खरं तर कंपनीला हरित धातू उत्पादनाच्या ऑपरेशनसाठी वित्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. या युनिटमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर बराच काळ नोकर कपातीची टांगती तलवार होती, मात्र आतापर्यंत त्यांच्या नोकऱ्या वाचवता आल्या.

हेही वाचाः RBIने ‘या’ पाच बँकांना ठोठावला ५० लाखांहून अधिकचा दंड, गुजरातच्या दोन बँकांचा समावेश, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

सरकारचे सहकार्य मिळत होते

पोर्ट टॅलबोट स्टीलवर्क्स हे ब्रिटनमधील सर्वात मोठे स्टील उत्पादन युनिट आहे. ब्रिटिश सरकार आपले कामकाज चालू ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यापासून वाचवण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवत होते. गेल्या वर्षाच्या अखेरीस सरकारने युनिटला ५०० दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे ५३०० कोटी रुपयांची मदत केली होती. मात्र, त्यावेळी ३ हजार लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याची भीतीही सरकारने व्यक्त केली होती.