मुंबई: एनएसडीएल या भारतातील आकाराने सगळ्यात मोठ्या डिपॉझिटरीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला आहे. सेबीकडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या आयपीओतून पाच कोटी ७२ लाख ६० हजार समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. या आयपीओतून कंपनीला साडेचार हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> टोमॅटोचे भाव पेट्रोल, डिझेलला वरचढ; महिनाभरात साडेचार पटींनी वाढ

या आयपीओच्या माध्यमातून आयडीबीआय बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया हे विद्यमान गुंतवणूकदार हिस्सेदारी विकणार आहेत. ‘ऑफर फॉर सेल’ या प्रक्रियेत ज्या कंपनीचा पब्लिक इश्यू बाजारात येणार असतो त्याचे सध्याचे गुंतवणूकदार आपल्या एकूण गुंतवणुकीतील काही टक्के हिस्सा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणतात.

भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा टक्का दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. जेवढे जास्त डिमॅट अकाउंट भविष्यात सुरू होणार आहेत तेवढा कंपनीचा व्यवसाय वाढताना दिसतो आहे. १९९६ मध्ये डिपॉझिटरी ऍक्ट आल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली.

हेही वाचा >>> चांगली बातमी! रेल्वे प्रवास आता स्वस्त होणार, एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात

भारतीय बाजारांमध्ये  सध्या दोन डिपॉझिटरी कार्यरत आहेत. एक सीडीएसएल. आणि दुसरी एनएसडीएल यापैकी डिमॅट अकाउंटची संख्या, शेअर्सची होणारी उलाढाल या दोन्हीचा विचार करता एनएसडीएल या कंपनीकडे बाजारहिस्सा अधिक आहे.  मार्च २०२३ अखेरीस  कंपनीची एकूण उलाढाल १०९९ कोटी इतकी होती आणि निव्वळ नफा २३४ कोटी रुपये होता. एनएसडीएलच्या या पब्लिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटी, आयडीबीआय कॅपिटल मार्केट अँड सिक्युरिटी, मोतीलाल ओसवाल इन्वेस्टमेंट आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे आहेत. आयपीओ ची निश्चित तारीख लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nsdl public issues nsdl files draft papers with sebi for ipo print eco news zws
Show comments