मुंबई: सरकारी मालकीची ‘महारत्न’ दर्जा प्राप्त असलेल्या एनटीपीसीची उपकंपनी ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’च्या प्रारंभिक समभाग विक्रीत (आयपीओ) मंगळवारी पहिल्या दिवशी ३३ टक्के भरणा झाला. किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद चांगला राहिल्याने, त्यांच्यासाठी राखीव हिश्शातून १३३ टक्के प्रतिसाद आला.राष्ट्रीय शेअर बाजाराकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीने आयपीओच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ५९.३१ कोटी समभागांपैकी पहिल्या दिवशी १९.४६ कोटी समभागांची मागणी नोंदवण्यात आली. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या भागासाठी १.३३ पट अधिक भरणा झाला. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीतून राखीव हिश्शातून १५ टक्के मागणी नोंदवली गेली. एनटीपीसी ग्रीन एनर्जीने सुकाणू गुंतवणूकदारांकडून ३,९६० कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. कंपनीने १०२ रुपये ते १०८ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला असून आयपीओ २२ नोव्हेंबरपर्यंत खुला राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा