पीटीआय, नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या मालकीची ‘महारत्न’ दर्जा प्राप्त असलेल्या एनटीपीसीची उपकंपनी ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’ प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १०,००० कोटींची निधी उभारणीची योजना आखत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनी गुंतवणूकदारांना अजमावण्याची शक्यता आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीने गेल्या आठवड्यात, आयपीओच्या माध्यमातून १०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयपीओ बाजारात धडकण्याची अपेक्षा आहे. यासंबंधी कंपनीने देशात (मुंबई) तसेच परदेशात विशेषतः सिंगापूरमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, अशी माहिती सूत्रांची दिली.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?

हेही वाचा >>>दूरसंचार कंपन्यांना थकीत देणींबाबत दिलासा नाहीच!

मसुदा प्रस्तावानुसार, (डीआरएचपी) प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून कंपनी केवळ नवीन समभागांची विक्री करणार आहे. आयपीओमध्ये प्रवर्तकांकडून आंशिक समभाग विक्री अर्थात ओएफएसचा समावेश नसेल. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी ७,५०० कोटी रुपये तिच्या सर्व उपकंपन्या आणि एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जाणार आहेत. तर उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील ‘महारत्न’ दर्जा प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. देशातील सहा राज्यांमध्ये तिचे सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत आहेत. एकंदरीत, एनटीपीसी समूहाने अक्षय्य ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून २०३२ पर्यंत ६० गिगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हेही वाचा >>>‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी

भारताचे अक्षय्य ऊर्जा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. जागतिक स्तरावर, पवन आणि सौर ऊर्जेसह एकंदर अक्षय्य ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे, असा क्रिसिलच्या अहवालाचा हवाला मसुदा प्रस्तावामध्ये देण्यात आला आहे.

एनटीपीसीचा समभाग मंगळवारच्या सत्रात १.०४ टक्क्यांनी वधारून ४२८.३५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ४.१५ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Story img Loader