मुंबई : भांडवली बाजारात सलग दोन सत्रांत सुरू राहिलेल्या तेजीला मंगळवारी खंड बसला आणि निर्देशांकांना पुन्हा घसरणीने घेरले. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे परकीय निधीचा प्रवाह घटला, शिवाय, अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.

मंगळवारच्या घसरणीसह सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांसाठी सरलेला ऑक्टोबर महिना हा विद्यमान २०२३ सालातील सर्वाधिक घसरणीचा महिना ठरला. मंगळवारी महिन्याच्या अंतिम दिवशी सेन्सेक्स २३२.७२ अंशांनी (०.३७ टक्के) घसरून ६३,८७४.९३ वर स्थिरावला. त्या उलट निफ्टी ६१.३० अंशांनी (०.३२ टक्के) घसरून १९,०७९.६० वर पोहोचला. व्यापक बाजारपेठेत मात्र खरेदीचे वातावरण होते. परिणामी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.२९ टक्के आणि ०.०२ टक्क्यांनी वाढले.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

हेही वाचा… Gold-Silver Price on 1 November 2023: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने खरेदी करण्याचा गोल्डन चांन्स; भाव झाला कमी, पाहा नवीन दर

आखातातील युद्ध स्थितीमुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या आणि भारतासारख्या निव्वळ आयातदारांसाठी ही अत्यंत नकारात्मक बाब ठरली. दुसरीकडे अमेरिकेतील रोख्यांचा परतावा लक्षणीय वाढल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत विक्रीचा दबाव बाजारावर कायम राहिला. परिणामी, परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत २२,८५० कोटी रुपये किमतीचे समभाग विकले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांचे विक्रीचे प्रमाणही जानेवारी २०२३ पासून कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक आहे.