भुवनेश्वर : विपुल खनिज संपदेने समृद्ध आणि देशातील सर्वात मोठे पोलाद उत्पादक राज्य ओदिशाची, राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत किती तरी जास्त दराने उद्योगदृष्टय़ा सुरू असलेली प्रगती पाहता, ते एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिले राज्य बनलेले दिसू शकेल, असा विश्वास जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी येथे गुरुवारी व्यक्त केला. देश-विदेशातील आघाडीच्या उद्योगांच्या प्रमुखांची उपस्थिती असलेल्या ‘मेक इन ओदिशा’ परिषदेच्या व्यासपीठावरून बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी काळी दुष्काळ आणि सर्वाधिक भूकबळीचा कलंक लागलेले ‘बीमारू’ राज्य ते देशातील आर्थिकदृष्टय़ा सर्वात सशक्त राज्य बनण्यापर्यंतच्या मागील दोन दशकांतील वाटचालीबद्दल परिषदेला उपस्थित सर्वच उद्योगपती भरभरून बोलत होते. खुद्द जिंदल यांनी ओडिशामधील सध्या सुरू असलेल्या ६०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांव्यतिरिक्त आणखी एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे सांगितले. नवीन गुंतवणूक ही पारादीप येथे नवीन पोलाद प्रकल्प आणि आयात पर्यायी ठरेल अशा सिलिकॉन व्हेपर निर्मितीच्या प्रकल्पांमध्ये ते करीत आहेत. त्यांच्या मते, सध्याच्या ६० हजार कोटी डॉलरवरून, एक लाख कोटी डॉलपर्यंत मजल खूपच महत्त्वाकांक्षी असली तरी ओदिशाला निश्चितच साध्य करता येईल.

देशातील सर्वात प्रगतिशील औद्योगिक धोरण आणि संलग्न पायाभूत सुविधा असणारे, शून्य वित्तीय तुटीसह आर्थिकदृष्टय़ा सशक्तता असलेले, सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय स्थिरता आणि सरकारच्या लोकाभिमुख कारभाराच्या परिणामी सामाजिक सद्भाव जपलेले राज्य म्हणून ओदिशाच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याबद्दल सर्वच उद्योगपतींनी आश्वासक विधाने केली. यामध्ये राज्यात खूप आधीपासून कैक हजार कोटींची गुंतवणूक असणारे आर्सेलोर मित्तल समूहाचे लक्ष्मी निवास मित्तल, वेदान्त रिसोर्सेसचे अनिल अगरवाल, टाटा स्टीलचे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन, जेएसपीएलचे अध्यक्ष नवीन जिंदल, हिंडाल्कोचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारिख, अदानी समूहाचे करण अदानी यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha to become fist state of a trillion dollar economy in india says sajjan jindal zws