मुंबई: सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेडने सोमवारी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्च असा २,२०२८.३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील तुलनेत तो १३.४५ टक्क्यांनी जास्त आहे. एकत्रित आधारावर, नुमालीगड रिफायनरीज लिमिटेडची कमाई लक्षात घेतल्यास, कंपनीचा निव्वळ नफा जानेवारी-मार्च २०२४ मध्ये १८ टक्क्यांनी वाढून २,३३२.९४ कोटी रुपये झाला आहे.
हेही वाचा >>> चौथ्या तिमाहीत विकासदर ६.२ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज; तिमाही तसेच आर्थिक वर्षासाठी आकडेवारी ३१ मेला अपेक्षित
संपूर्ण २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी माक्ष तिचा एकत्रित निव्वळ नफा २९ टक्क्यांनी घसरून ६,९८०.४५ कोटी रुपयांवर सीमित राहिला आहे. वैधानिक अनुपालनासाठी केलेल्या तरतुदींमुळे वार्षिक नफा घटल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १:२ (प्रत्येक दोन समभागांसाठी एक विनामूल्य समभाग) या प्रमाणात बक्षीस समभाग देण्यास सोमवारी मान्यता दिली. तसेच प्रति समभाग (बोनस पूर्व) ३.७५ रुपयांच्या अंतिम लाभांशालाही मान्यता दिली आहे. आधी दिलेला प्रत्येकी ३.५० रुपयांचा अंतरिम लाभांश जमेस धरल्यास, आर्थिक वर्षासाठी कंपनीने दिलेला एकूण लाभांश ८.५० रुपये होईल.