पीटीआय, नवी दिल्ली

भारताने जुलैमध्ये रशियाकडून २.८ अब्ज डॉलर मूल्याचे खनिज तेल आयात केले. चीननंतर रशियन तेलाचा भारत सर्वात मोठा आयातदार आहे, असे एका अहवालातून समोर आले आहे. युक्रेन युद्धपूर्व काळात एकूण आयातीत एक टक्क्याहून कमी असलेला रशियन तेलाचा वाटा आता ४० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यांनतर काही युरोपीय राष्ट्रांनी रशियाकडून इंधन खरेदी टाळल्याने रशियाने तेल सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले. परिणामी, सवलतीच्या दराचा फायदा घेण्यासाठी भारताने रशियाकडून इंधन खरेदी सुरू केली.

हेही वाचा >>>वस्तू निर्यातीत जुलैमध्ये १.२ टक्क्यांची घट; व्यापार तुटीत २३.५ अब्ज डॉलरपर्यंत विस्तार

रशियाच्या खनिज तेल निर्यातीपैकी ४७ टक्के चीनने खरेदी केले, त्यानंतर भारत (३७ टक्के), युरोपीय महासंघ (७ टक्के) आणि तुर्कीयेने (६ टक्के) खरेदी केले आहे, असे ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राने (सीआरईए) दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

खनिज तेलाबरोबरच चीन आणि भारताने रशियाकडून कोळसा खरेदी केला आहे. ५ डिसेंबर २०२२ पासून जुलै २०२४ अखेरपर्यंत, चीनने रशियाच्या सर्व कोळशाच्या निर्यातीपैकी ४५ टक्के खरेदी केला आणि त्यापाठोपाठ भारताने १८ टक्के. तुर्कीये १० टक्के, दक्षिण कोरिया १० टक्के आणि तैवानची खरेदी ५ टक्के आहे.

जुलैमध्ये चीन हा रशियाच्या खनिज इंधनाचा सर्वात मोठा खरेदीदार होता, ज्याचा वाटा रशियाच्या मासिक निर्यात कमाईच्या ४३ टक्के (६.२ अब्ज युरो) रशियाकडून चीनच्या आयातीपैकी ६३ टक्के (३.९ अब्ज युरो) खनिज तेलाचा समावेश आहे. चीननंतर रशियाकडून भारताने सर्वाधिक खनिज तेल खनिज तेल खरेदी केले. भारताच्या खनिज तेलाच्या आयातीपैकी जवळपास ८० टक्के आयात (२.६ अब्ज युरो) रशियातून करण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे.

आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ८५ टक्क्यांहून अधिक आयातीवर अवलंबून असलेल्या भारताने जुलैमध्ये १.९४ कोटी टन खनिज तेलाच्या आयातीवर ११.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.