सेकंड हँड कारच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या OLX Auto कंपनीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. Sobek Auto India Pvt Ltd (OLX Auto ची मूळ कंपनी)ला कार ट्रेड टेकने ताब्यात घेतलं आहे. या संपादनासाठी कार ट्रेड टेकने ५३७ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. खरं तर वाईट काळातून जात असलेली OLX गेल्या काही दिवसांपासून आपला ऑटोमोटिव्ह विभाग विकण्याचा प्रयत्न करत होती. अखेरीस कंपनीचा हा विभाग कार ट्रेड टेकने विकत घेतला आहे.
कार ट्रेडने बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सोबेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे १०० टक्के शेअर्स खरेदी करणार आहे. सोबेक ही OLX इंडियाच्या ऑटो सेल्स डिव्हिजनच्या मालकीची कंपनी आहे. १० जुलै २०२३ रोजी CarTrade Tech ने Sobek Auto India Private Limited आणि तिची होल्डिंग कंपनी OLX India BV कडून Sobek मध्ये १०० टक्के शेअर खरेदी करण्याचा करार केला आहे, असंही कंपनीने BSE ला कळवले आहे. कार ट्रेड टेक सध्या देशात OLX चा विद्यमान व्यवसाय सुरू ठेवणार आहे.
हेही वाचाः अदाणींचा नवा प्लॅन; अनिल अंबानींचा दिवाळखोर कोळसा प्लांट विकत घेण्याच्या तयारीत
अधिग्रहणाची प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण होणार
कार ट्रेड टेकच्या मते, ३० दिवसांत अधिग्रहण पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये कंपनीचा एकूण खर्च ५३६.४३ कोटी रुपये असेल. ही रक्कम संपादनाच्या शेवटच्या तारखेला दिली जाते. OLX इंडियाने ३० जून रोजी आपला वर्गीकृत इंटरनेट व्यवसाय सोबेकला विकला आहे.
हेही वाचाः १९ वर्षांनंतर टाटांचा IPO येणार, शेअर्स खरेदीसाठी गर्दी, ग्रे मार्केटमध्ये दर गगनाला भिडले
olx वाईट काळातून जातोय
OLX ग्रुप गेल्या काही वर्षांपासून अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. जूनमध्ये कंपनीने जगभरात पसरलेल्या आपल्या कार्यालयांमधील ८०० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली, जेव्हा कंपनीने OLX Autos बंद करण्यास सुरुवात केली आणि कंपनी कार ट्रेडसह अधिग्रहण चर्चेच्या जवळजवळ गंभीर टप्प्यात पोहोचली होती.