मुंबई : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संकट, अमेरिकी रोख्यांवरील वाढता परतावा दर आणि देशांतर्गत आघाडीवर कंपन्यांच्या सप्टेंबर तिमाहीत असमाधानकारक कामगिरीमुळे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सलग पाचव्या सत्रात चौफेर समभाग विक्रीचा मारा लावला आहे. परिणामी बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्यांपर्यत घसरण झाली. गेल्या पाच सत्रातील व्यापक घसरणीमुळे गुंतवणूकदारांची १५ लाख कोटींची संपत्ती लयाला गेली आहे.

सलग पाचव्या दिवशी सुरू असलेल्या घसरणीमुळे, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२२.८२ अंशांनी घसरून ६४,०४९.०६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६५९.७२ अंश गमावत ६३,९१२.१६ अंशांची सत्रातील नीचांकी पातळी गाठली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १५९.६० अंश गमावले आणि तो १९,१२२.१५ अंशांवर स्थिरावला.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त

इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि दुसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या हंगामाचा आशावादी दृष्टिकोन असूनही, व्याजदर पुन्हा वाढतील या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. महागाई नियंत्रणासाठी मध्यवर्ती बँकांनी व्याजदर पुन्हा वाढवल्यास विकासाची गती मंदावण्याची भीती आहे. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन देखील अधिक आहे. गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे धोरण हितावह असेल, असा सल्ला जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी दिला आहे.

सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, भारती एअरटेल, एनटीपीसी, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्र, टायटन आणि अॅक्सिस बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर टाटा स्टील, स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, मारुती आणि नेस्लेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.

१५ लाख कोटींची संपत्ती लयाला

गेल्या पाच सत्रांमध्ये, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५.०९ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल

३२३.८२ लाख कोटी रुपयांवरून ३०८.७३ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. बुधवारच्या सत्रात झालेल्या घसरणीमुळे एका सत्रात गुंतवणूकदारांची २.२२ लाख कोटी रुपयांची संपत्ती लयाला गेली.

घसरणीमागील प्रमुख कारणे

खनिज तेल – इस्रायल-हमास संघर्ष आणखी तीव्र झाल्यास खनिज तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जी प्रतिपिंप ८८ डॉलरवर आहे. यामुळे अनेक उद्योगांसाठी आवश्यक कच्चा माल महाग होईल, शिवाय राहणीमानाचा खर्च वाढेल. या सर्वांचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल.

रोखे परतावा दर – अमेरिकी रोखे ही जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या १० वर्ष मुदतीच्या अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दर हा ५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. परिणामी उदयोन्मुख बाजारपेठेतून गुंतवणूक जाण्याची अपेक्षा आहे.

एफआयआयकडून विक्री मारा – परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सप्टेंबरमध्ये १४,७६८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. तर विद्यमान ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सुमारे १०,३४५ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.

आयटी क्षेत्राची निराशाजनक कामगिरी – माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची सप्टेंबर तिमाहीतील आर्थिक कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे एकूणच बाजाराचा मूडपालट झाला आहे. युरोपातील मंदीसदृश परिस्थितीमुळे बहुतांश आयटी कंपन्यांना मंदीचा सामना करावो लागतो आहे.

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ६४,०४९.०६ – ५२२.८२ (- ०.८१)
निफ्टी १९,१२२.१५ -१५९.६० (- ०.८३)

डॉलर ८३.१८ २ पैसे
तेल ८८.३२ ०.३०