मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात ५०० अंशांची कमाई करत ७४,००० अंशांच्या पातळीवर पुन्हा विराजमान झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या खरेदीमुळे निर्देशकांना बळ मिळाले.

गुरुवारी दिवसअखेर सेन्सेस ४८६.५० अंशांनी वधारून ७४,३३९.४४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो ७१८.३१ अंशांनी वधारून ७४,५७१.२५ या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६७.९५ अंशांची वाढ झाली आणि तो २२,५७०.३५ पातळीवर बंद झाला.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
reserve bank predict retail inflation at 4 9 percent for the fy25
महागाईचे चटके वाढणार; रिझर्व्ह बँकेचा चालू आर्थिक वर्षासाठी ४.९ टक्क्यांचा अंदाज
rbi repo rate marathi news
RBI Repo Rate: व्याजदर पुन्हा जैसे थे; सलग ११व्यांदा आरबीआयच्या पतधोरणात बदल नाही!

इराण-इस्रायलमधील तणाव कमी झाल्यामुळे आणि अमेरिकेतील मागणी कमकुवत झाल्यामुळे खनिज तेलाच्या किमती कमी झाल्या. निर्मिती आणि सेवा क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांकातील वाढीमुळे बाजारपेठेत उत्साही वातावरण होते.

हेही वाचा >>>Stock Market Today: जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’ची शतकी दौड

खासगी बँकांवरील रिझर्व्ह बँकेच्या कारवाईच्या बडग्यामुळे गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर (पीएसयू बँका) केंद्रित केले. परिणामी त्यांची कामगिरी चांगली राहिली. गुंतवणूकदारांनी आता कंपन्यांच्या तिमाहीवर लक्ष केंद्रित केले आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये ॲक्सिस बँकेच्या समभागाने ६ टक्क्यांची झेप घेतली. त्यापाठोपाठ स्टेट बँक, एनटीपीसी, नेस्ले, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, महिंद्र अँड महिंद्र आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, बजाज फायनान्स, मारुती आणि एशियन पेंट्सच्या समभागात घसरण झाली. रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेला नवीन क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन माध्यमातून नवीन ग्राहकांना समाविष्ट करण्यास प्रतिबंध घातल्याने समभागात १०.५८ टक्क्यांची घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी २,५११.७४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

बाजार भांडवल ४०४ लाख कोटींच्या शिखरावर

सलग पाच सत्रातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ११.२९ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ४०४.१८ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहे. गेल्या पाच सत्रांमध्ये, सेन्सेक्स १,८५०.४५ अंशांनी म्हणजेच २.५५ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांची संपत्ती ११,२९,३६३.०१ कोटी रुपयांनी वाढली आहे. परिणामी गुरुवारी बाजार भांडवलाने ४,०४,१८,४११.३२ कोटींच्या विक्रमी उच्चांकाला गाठले.

सेन्सेक्स ७४,३३९.४४ ४८६.५० ( ०.६६)

निफ्टी २२,५७०.३५ १६७.९५ ( ०.७५)

डॉलर ८३.३२ -१

तेल ८८.०७ ०.०६

Story img Loader