मुंबई : ई-व्यापाराच्या सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे प्रवर्तित ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी)’ने वित्तीय सेवा क्षेत्रात प्रवेश घोषित करताना, संपूर्ण डिजिटल आणि कागदरहित पतपुरवठ्याची योजना गुरुवारी जाहीर केली. प्रामुख्याने ओएनडीसी मंचावरील उत्पादक, विक्रेत्यांसाठी खेळत्या भांडवलासाठी कर्ज देणारी ही योजना असून, अर्ज केल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचे भाव कोसळल्यानंतर पुन्हा वधारले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत आता…

या नवीन उपक्रमामध्ये सध्या नऊ कर्ज सेवा प्रदाते आणि प्रत्यक्ष कर्ज पुरवठादार म्हणून तीन बँका व बँकेतर वित्तीय कंपन्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. कर्ज सेवा क्षेत्रात व्याप आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या ओएनडीसी जाळे विस्तारण्याच्या मोहिमेतील हा एक लक्षणीय टप्पा आहे. यातून उसनवारीचा अनुभव सहजसाध्य, सुलभ आणि किफायतशीर होण्याबरोबरच, सर्वंकष आर्थिक वृद्धीला पूरक वित्तीय सर्वसमावेशनही साधले जाईल, असा दावा ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी टी. कोशी यांनी केला. कर्ज सेवा प्रदाते म्हणून ईझीपे, पैसाबझार, टाटा डिजिटल, इनव्हॉईइसपे, क्लिनिक३६०, झ्यापार, इन्डीपे, टायरप्लेक्स आणि पेनीयरबाय यांचा समावेश आहे, तर कर्ज देणाऱ्यांत आदित्य बिर्ला फायनान्स, डीएमआय फायनान्स आणि कर्नाटक बँकेचा समावेश आहे. या कर्ज सुविधेची व्याप्ती वाढवण्यासाठी अन्य बँका आणि कर्ज मध्यस्थांशी ओएनडीसीची बोलणी सुरू आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ondc launches digital credit services introduces fully digital paperless loans print eco news zws