लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : प्रुडंट कॉर्पोरेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेसने त्यांच्या व्यवस्थापनाखालील म्युच्युअल फंड मालमत्तेत १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे घोषित केले. सरलेल्या २६ जुलैला ही कामगिरी प्रुडंटने केली आणि असा टप्पा गाठणारी दुसरी बँकेतर म्युच्युअल फंड वितरक आहे. गेल्या पाच वर्षांत तिच्या समभागसंलग्न अर्थात इक्विटी मालमत्तेत पाच पटीने वाढ झाली आहे.
तंत्रज्ञानसमर्थ वितरक मंचांशी भागीदारी करण्याकडे म्युच्युअल फंड घराण्यांचे आणि वितरकांचे आकर्षणही करोनाकाळानंतर अनेक पटीने वाढले आहे. प्रुडंटच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मंचावर सामील होणाऱ्या म्युच्युअल फंड वितरकांची (एमएफडी) ची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. यावर भाष्य करताना प्रुडंट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पटेल म्हणाले, एकूण उद्योगातील २८ टक्क्यांच्या तुलनेत प्रुडंटची इक्विटी मालमत्ता ४० टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढली आहे. मासिक एसआयपी प्रवाहात वाढीचा दरदेखील उद्योगातील २१ टक्क्यांच्या तुलनेत २६ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढला आहे आणि गुंतवणूकदार फोलिओची संख्या २१ टक्के चक्रवाढ दराने वाढली आहे.
आणखी वाचा-जीएसटी संकलन जुलैमध्ये १.८२ लाख कोटींवर
जुलै २०२४ मध्ये प्रुडंटकडील मासिक एसआयपी प्रवाहाने महत्त्वपूर्ण ८०० कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. ३०,००० हून अधिक वितरक भागीदार आणि १७ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांच्या जाळ्याला प्रुडंटच्या या प्रगतीचे श्रेय जाते, असे पटेल म्हणाले.