Maharera housing projects notices : जानेवारीत महारेरांकडे ७४६ नवीन गृहनिर्माण प्रकल्प नोंदवले गेले. सुमारे २२ हजार ४४९ कोटींच्या या प्रकल्पांत ५० हजार २८८ सदनिका असणार आहेत. स्थावर संपदा अधिनियमानुसार संबंधित विकासकांनी प्रकल्पात दर ३ महिन्याला किती नोंदणी झाली, किती पैसे आले, किती खर्च झाला इत्यादी माहितीचा तपशील असलेले प्रपत्र १, २ आणि ३ संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या किंवा करणाऱ्या ग्राहकाला घरबसल्या ही प्राथमिक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही कायदेशीर तरतूद आहे. या नवीन विकासकांनी ही माहिती, पहिला तिमाही अहवाल म्हणून २० एप्रिलपर्यंत अद्ययावत करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या नवीन ७४६ पैकी ५८४ विकासकांनी ही माहिती अद्ययावत केली नसल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. या सर्वांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या तिमाहीपासून सर्व प्रपत्र विनाविलंब अद्ययावत असावे म्हणून याबाबतचा निष्काळजीपणा, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी महारेराची स्पष्ट भूमिका आहे. यासाठी महारेरा प्रकल्पांच्या तिमाही वित्तीय प्रगती अहवालाचे सनियंत्रण ( Financial Quarter Based Project Progress Reporting System) पहिल्या तिमाहीपासून करणार आहे. या सर्वांना प्रपत्र अद्ययावत करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न देणाऱ्या विकासाकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Out of 746 housing projects reported to maharera in january 584 projects have been served with show cause notices vrd