नवी दिल्ली: कर-निर्धारण वर्ष २०२२-२३ साठी ७ कोटी ४० लाखांहून अधिक व्यक्तींनी प्राप्तिकर विवरणपत्र भरले, तर त्यापैकी ५.१६ कोटी व्यक्तींनी त्यांचे करदायित्व शून्य असल्याचे दाखवले, अशी माहिती अर्थमंत्रालयाकडून सोमवारी देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे गेल्या चार वर्षांत शून्य करदायित्व असणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली की, गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आली आहे. विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या २०१८-१९ मधील ६.२८ कोटींवरून, २०१९-२० मध्ये ६.४७ कोटी, २०२०-२१ मध्ये ६.७२ कोटी झाली. २०२१-२२ आर्थिक वर्षात विवरणपत्र दाखल केलेल्यांची संख्या ६.९४ कोटींहून अधिक आणि २०२२-२३ या कर-निर्धारण वर्षात ती ७.४० कोटींहून अधिक झाली. मात्र त्यापैकी प्रत्यक्ष करभरणा करणारे करदाते हे केवळ जेमतेम सव्वा दोन कोटीच असल्याचे अर्थराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… प्रत्यक्ष कर संकलनांत २१ टक्के वाढ, डिसेंबरमध्यापर्यंत अग्रिम करातही १९.९४ टक्के वाढ

गेल्या चार वर्षांत विवरणपत्र तर भरले, मात्र करदायित्व शून्य आहे अशांची संख्या कर निर्धारण वर्ष २०१९-२० मधील २.९० कोटींवरून, २०२२-२३ मध्ये ५.१६ कोटी अशी वाढत आली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 7 40 crore persons filed itrs in fy23 print eco news asj