पुणे : देशात मागील वर्षी जमिनीचे ९७ मोठे व्यवहार झाले असून, हे व्यवहार एकूण २,७०७ एकराचे आहेत. या व्यवहारांपैकी तब्बल ७२ टक्के व्यवहार हे निवासी प्रकल्प उभारणीसाठी झाले आहेत. अनारॉक समूहाने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल गुरुवारी जाहीर केला. या अहवालानुसार, देशात २०२२ मध्ये जमिनीचे ८२ मोठे व्यवहार झाले होते आणि ते एकूण २,५०८ एकराचे होते. त्या तुलनेत मागील वर्षी व्यवहारांची संख्या आणि एकूण जमीन क्षेत्रफळातही वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अर्थव्यवस्थेबाबत ‘इक्रा’चा मोठा अंदाज

मागील वर्षी झालेल्या ९७ जमीन व्यवहारांपैकी ७४ व्यवहार हे निवासी प्रकल्पांसाठीचे आहेत. ते एकूण १,९४५ एकराचे आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत जमिनीचे एकूण १७९ मोठे व्यवहार झाले असून, ते एकत्रितपणे ५,२१५ एकराचे आहेत. मागील वर्षी औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्र आणि उत्पादन प्रकल्पासाठी जमिनीचे सहा व्यवहार झाले असून, ते ५६४ एकराचे आहेत. संमिश्र वापरासाठी सात व्यवहार झाले असून, ते १२६ एकराचे आहेत. वाणिज्य वापरासाठी आणि माहिती-तंत्रज्ञान केंद्रांसाठी पाच व्यवहार झाले असून, ते २७.५ एकराचे आहेत. रिटेल, आदरातिथ्य आणि इतर वापरासाठी पाच व्यवहार झाले असून, ते ४३ एकराचे आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

शहरनिहाय जमिनीचे मोठे व्यवहार

दिल्ली – २२

मुंबई – २५

बंगळूरु – ११

हैदराबाद – १०

पुणे – ६

चेन्नई – ७

कोलकता – ३

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over percent of land deals in last year for residential projects print eco news zws