नवी दिल्ली : सरलेल्या २०२४ मध्ये भारतीय कंपन्यांची परदेशातून कर्ज उभारणी २०.१ टक्क्यांनी कमी होऊन २३.३३ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली, जी मागील वर्षी याच कालावधीत २९.२२ अब्ज डॉलर होते. डॉलरच्या तुलनेत रुपयातील तीव्र घसरणीने अशी कर्ज उभारणी महागणार असून, कंपन्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत.

वर्ष २०२२ मध्ये भारतीय कंपन्यांनी परदेशातून १४.३८ अब्ज डॉलरचे कर्ज उभारले होते. त्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये ते दुपटीने वाढले आणि एका दशकातील ती सर्वाधिक वाढ होती. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असल्याने, भारतीय कंपन्यांना परदेशातून ज्यादा दराने कर्ज उभारावे लागत आहे. शिवाय कर्जावरील व्याज परतफेडीचा आणि जोखीम खर्चही वाढणार आहे.

Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
volatility , stock market, stock market news,
धन जोडावे : शेअर बाजारात अस्थिरतेची नांदी?
Half percent interest rate reduction
कर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेकडून सहामाहीत अर्धा टक्के व्याज दरकपात शक्य

हेही वाचा >>> डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?

डॉलरच्या सशक्ततेमुळे फारच कमी कंपन्या परदेशातून कर्ज उभारणीचा पर्याय निवडतील. अनेक भारतीय कंपन्यांनी आता कर्जासाठी स्थानिक बँकांकडे मोर्चा वळवला आहे. चांगले मानांकन प्राप्त असलेल्या कंपन्यांसाठी स्थानिक आणि परकीय चलनातील कर्जांच्या दरातील फरक आता सुमारे २००-२५० आधारबिंदू आहे, असे आघाडीचे आर्थिक सल्लागार प्रबल बॅनर्जी म्हणाले.

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण तीव्र झाली असून सप्टेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत डॉलरच्या तुलनेत तो ४.४ टक्क्यांनी घसरला आहे. तर विद्यमान वर्षात त्यात १०० पैशांहून अधिक घसरण झाली आहे.

Story img Loader