Ram Temple consecration ceremony: ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांच्या प्रचंड गर्दीला सामोरे जाण्यासाठी हॉस्पिटॅलिटी चेन बनवण्याची ओयो तयारी करीत आहे. ओयोचे मालक आणि अब्जाधीश रितेश अग्रवाल यांनी राम मंदिराच्या निमंत्रण पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश अग्रवाल यांनी योगी सरकारचे केले कौतुक

रितेश अग्रवाल यांनी राम मंदिर आमंत्रणाचे वर्णन ‘वैयक्तिक आनंदाचे स्रोत’ आणि ‘संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब’ असे केले आहे. अयोध्येचे भारताच्या आध्यात्मिक पर्यटन परिसंस्थेतील एक उज्ज्वल स्थान म्हणून कौतुक केले पाहिजे. याशिवाय त्यांनी आपल्या दीर्घ कार्यकाळातील उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणांचेही कौतुक केले आहे. योगी सरकारच्या मदतीने ओयो अयोध्या शहरात मजबूत अस्तित्व निर्माण करेल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचाः SBI कडून ग्राहकांसाठी Green Rupee Term Deposit योजना सुरू, कोण करू शकते गुंतवणूक?

ओयोचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. “या महत्त्वाच्या प्रसंगी मला सामील होण्याचे आमंत्रण मिळाल्यामुळे मी आनंदित झालो आहे. २२ जानेवारी रोजी होणारा अभिषेक सोहळा ही भारताच्या नव्या आध्यात्मिक अध्यायाची सुरुवात आहे. अयोध्येचे सांस्कृतिक महत्त्व उंचावले जात असून, ही वैयक्तिक अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. भारतातील आणि लवकरच जगभरातील आध्यात्मिक प्रवासासाठी अयोध्या हे सर्वात मोठे गंतव्यस्थान असणार आहे. ३ लाखांहून अधिक पर्यटकांच्या अपेक्षित दैनंदिन दर्शनासह अयोध्या हे भारताच्या आध्यात्मिक पर्यटन परिसंस्थेतील एक महत्त्वाचे स्थान ठरणार आहे.

हेही वाचाः Artificial intelligence मुळे जगभरातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात, IMFचा इशारा

उत्तर प्रदेश सरकारची प्रगतिशील धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात पर्यटन आणि व्यवसायाची भरभराट होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या संधी आणि उद्योजकतेच्या जोडीने ओयोला अयोध्येत मजबूत उपस्थिती प्रस्थापित करण्यास सक्षम केले आहे. अयोध्येतील आध्यात्मिक चैतन्य अनुभवण्यासाठी भारत आणि जगभरातील यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी आणि त्यांना सुलभ प्रवेश मिळावा, यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. अयोध्येत व्यवसाय आणि विश्वास अखंडपणे नांदतात, हे एक अफाट आध्यात्मिक महत्त्व असलेले शहर आहे, जे मौल्यवान व्यवसाय संधीसुद्धा उपलब्ध करून देत आहे. खरं तर हा केवळ वैयक्तिक आनंदाचाच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे…”

रितेश अग्रवालने निमंत्रण पत्रिकेचा एक सुंदर फोटो केला शेअर

ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांनी शेअर केलेल्या निमंत्रण पत्रिकेसमोर अयोध्येतील राम मंदिराचे रेखाचित्र आहे. अभिषेक समारंभाची तारीख आत कोरलेली आहे. अभिषेक सोहळ्याला अनेक दिग्गज नेते आणि नावाजलेली नावं उपस्थित राहतील. राम मंदिराच्या भव्य उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर या सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oyo ceo ritesh agarwal also invited to the ram mandir ceremony shared this photo vrd