ग्लोबल हंगर इंडेक्सवर पाकिस्तानचा स्कोअर २००६ मधील ३८.१ होता, जो २०२२ मध्ये २६.१ वर घसरला आहे, त्यामुळेच पाकिस्तान आणि तेथील लोकांसमोरील संकट वाढल्याचं चित्र समोर आलं आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) च्या पाकिस्तान चॅप्टरने मंगळवारी ही आकडेवारी जाहीर केली. जीएचआयने सर्वेक्षण केलेल्या १२१ देशांपैकी पाकिस्तान ९९व्या क्रमांकावर आहे. लष्करी संघर्ष, हवामान बदल आणि कोरोना साथीच्या रोगामुळे एकत्रितपणे ८२८ दशलक्ष लोकांना उपाशी राहावे लागले आहे, असे GHI ने एका निवेदनात म्हटल्याचे डॉनने वृत्त दिले आहे.
जीएचआयनं एक निवेदनही प्रसिद्ध केलं आहे. सध्या बिकट परिस्थिती दिसत असल्याने २०३० पर्यंत ४६ देश उपासमारीच्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचू शकणार नाही, असंही निवेदनात म्हटलं आहे. भूक पूर्णतः नाहीशी करणे तर दूरची गोष्ट आहे. आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिण आणि दक्षिय आशिया पुन्हा एकदा उपासमारीचे सर्वाधिक दर असलेले प्रदेश बनले आहेत. दक्षिण आशिया हा जगातील सर्वाधिक उपासमारीची पातळी असलेला प्रदेश आहे. मुलांच्या भुकेत वाढ होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे आणि तसेच जगातील इतर कोणत्याही प्रदेशापैकी इथे बाल कुपोषणाचा दर सर्वाधिक आहे.
पाकिस्तानात काम सुरूच राहणार
GHI हा पूर्व पुनरावलोकन केलेला वार्षिक अहवाल आहे, जो Welthungerhilfe आणि Concern Worldwide यांनी संयुक्तपणे प्रकाशित केला जातो, ज्याचे उद्दिष्ट भुकेविरुद्धच्या लढ्याबद्दल जागरुकता वाढवणे आहे. वेल्थंगरहिल्फच्या कंट्री डायरेक्टर आयशा जमशेद यांनी सांगितले की, त्यांच्या संस्थेने नागरी समाज, सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने प्रत्येक समुदायापर्यंत अन्न पोहोचवण्याचे काम केले आहे.
हेही वाचाः ऑनलाइन गेमिंगवरील कराचा अंतिम निर्णय आता GST कौन्सिलच्या आगामी बैठकीत; २८ टक्के करावर चर्चा होणार
नागरी संस्था, छोटे उत्पादक, शेतकरी आणि स्थानिक गटांनी स्थानिक ज्ञान आणि जगण्याचा अनुभव लक्षात घेऊन पौष्टिक अन्न कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, याचा विचार करावा, असंही त्या म्हणाल्यात.