पीटीआय, कोलकाता
Bandhan Bank: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बंधन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पार्था प्रतिम सेनगुप्ता यांनी शुक्रवारपासून पदभार स्वीकारला. सेनगुप्ता यांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेने या आधीच मंजुरी दिली असून, त्यांनी १० नोव्हेंबरपासून कार्यभार स्वीकारावा असे सूचित केले होते. ते पुढील तीन वर्षांसाठी बँकेच्या प्रमुखपदी कार्यरत राहतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंधन बँकेचे संस्थापक चंद्रशेखर घोष यांच्या निवृत्तीनंतर अंतरिम व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रतन कुमार केश सेनगुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता सेनगुप्ता यांची निवड झाल्यांनतर ते या खासगी बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळतील.

हेही वाचा : परकीय विक्रेत्यांपेक्षा देशांतर्गत खरेदीदारांचा बाजारात जोर; ‘एफआयआय’ची ८५,००० कोटींच्या समभाग विक्री, तर ‘डीआयआय’कडून १ लाख कोटींची खरेदी

u

स्टेट बँकेमध्ये आपली कारकीर्द सुरू केल्यानंतर पार्था सेनगुप्ता यांनी २०२० ते २०२२ या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद भूषवले होते.

हेही वाचा : सरकारी बँका, वित्त संस्थांची भंगार विक्रीतून ४.५ कोटींची कमाई

प्रवीणा राय एमसीएक्सच्या मुख्याधिकारीपदी

अग्रगण्य कमॉडिटी एक्सचेंज असलेल्या मल्टिकमॉडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रवीणा राय यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राय यांनी शुक्रवारपासून (३१ ऑक्टोबर) पदभार स्वीकारला, अशी माहिती एमसीएक्सने एका निवेदनाद्वारे दिली. प्रविणा राय यांची नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (एनपीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारकीर्द राहिली असून, कालच (गुरुवारी) त्यांनी राजीनामा देऊन हे पद त्यागले आहे. एनपीसीआयमध्ये त्यांनी विपणन, व्यवसाय विकास, उत्पादन व्यवस्थापन आणि कार्यसंचालन धोरणाचे नेतृत्व केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Partha pratim sengupta assumes charge as bandhan bank new md ceo print eco news css