पुणे : आरोग्य विम्यावरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याबाबत विचार सुरू असून, तो कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांसोबत विम्या कंपन्यांनाही होईल, असे प्रतिपादन एचडीएफसी अर्गोचे संचालक व मुख्य व्यवसाय अधिकारी पार्थनील घोष यांनी केले.

देशात आरोग्य विम्याबाबत जागरूकता वाढण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विम्यावरील जीएसटीचा दर कमी करण्याची, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जीएसटी दर शून्यावर आणण्याची चर्चा आहे. आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी केल्यास ग्राहकांचा विमा हप्ता कमी होईल. यातून विमा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल, ज्यायोगे विमा कंपन्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असे घोष म्हणाले.

हेही वाचा >>>Gold Silver Price Today : लग्नसराई सुरू होताच सोने चांदीचे दर वाढले! एका दिवसात सोने इतक्या रुपयांनी महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

एचडीएफसी अर्गोचे महाराष्ट्रात ६,४१६ विक्रेते आहेत. कंपनीचे राज्यात ४२ शाखांचे जाळे असून, त्यातील तीन शाखा पुण्यात आहेत. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीने महाराष्ट्रात २,१२१ कोटी रुपयांचे आरोग्य विम्याचे ४.२९ लाख दावे निकाली काढले आहेत. त्यात पुण्यातील ७० कोटी रुपयांचे १७,२१४ दावे आहेत, असे घोष यांनी नमूद केले.

Story img Loader